IMG-20220623-WA0016
कर्जत कोकण सामाजिक

पेजनदीचे पाणी वाढल्याने आठ तरुण अडकले ; स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना वाचविले

पेजनदीचे पाणी वाढल्याने आठ तरुण अडकले

स्थानिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने सर्वांना वाचविले; कर्जत वैजनाथ येथील घटना

कर्जत/ नितीन पारधी :
रत्नागिरी येथून कर्जत येथील आपल्या नातेवाईक यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले आठ तरुण पेजनदी मध्ये वाढलेल्या पाण्यामुळे अडकले. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथे अडकल्लेल्या त्या तरुणांना स्थानिक तरुणांनी दोरखंड च अवलंब करून नदीच्या बाहेर काढले आणि त्या सर्वांचे प्राण वाचविले.
कर्जत शहरातील आपल्या नातेवाईक यांच्याकडे रत्नागिरी येथील पाहुणे आले होते. रविवार असल्याने वन भोजन करण्याचा कार्यक्रम तयार करून ते सर्व जण वैजनाथ येथे पोहचले. या भागात पाऊस रिमझिम पडत असून अद्याप हिरवळ देखील उगवलेली नाही. त्यामुळे त्या भागात असलेल्या शेत जमिनीला पेजनदीचे पाणी ज्या कालव्यातून सोडले जाते. त्या कालव्याच्या झिरो बंधारा येथे त्या सर्वांनी गुडघाभर पाण्यात मौजमजा केली आणि दुपारी दीड चे सुमारास चुलीवर शिजवलेले अन्न तयार झाल्यावर त्या सर्वांनी पेजनदीच्या मध्ये असलेल्या बंधाऱ्यावर जावून जेवणाचा आनंद घेण्याचा निश्चय केला. त्यावेळी अचानक पेज नदीच्या पात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढू लागला आणि ते सर्व आठ जण ज्या ठिकाणी बसले होते, त्या बंधाऱ्याच्या आजूबाजूला पाणी भरून आले. त्यावेळी वैजनाथ गावातील अमित गुरव आणि प्रशांत बारणे हे दोघे रविवार ची सुट्टी असल्याने पेज नदीवर फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्या आठ तरुणांनी सुरू केलेला आरडाओरड पाहून नदीकडे धाव घेतली. तेथे आठ तरुण नदीच्या मधोमध अडकलेले पाहून तेथे वैजनाथ येथे गावात जावून ग्रामपंचायत सरपंच यांचे पती सूरज गुरव यांच्या कानावर ही माहिती सांगितली.
त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सूरज गुरव यांनी आपल्या गावातील गणेश भोईर, सरदार कांबळे, शरद रमेश पवार, नामदेव कातकरी तसेच अमित गुरव आणि प्रशांत बारणे यांनी सोबत दोरखंड घेवून नदी गाठली. नदीमध्ये उतरून त्या सर्व तरुणांनी नदीच्या मधोमध असलेला बंधारा गाठला आणि एक एक करीत सर्व आठ जणांना बाहेर काढले आणि सर्वांचे प्राण वाचविले. मात्र त्यानंतर रत्नागिरी येथील त्या तरुणांनी आपल्या जीप मध्ये बसून तेथून धूम ठोकली.

—————–
वीज ग्रहातून पाणी सोडल्याने नदी मध्ये आले पाणी…
आंद्र धरणातून रविवारी उशिरा पाणी सोडले जाते, त्यामूळे पेज नदी दिवसभर कोरडी असते. पण 19 जून रोजी धरणातून दुपारी पाणी सोडले आणि पेज नदीला पाणी अचानक वाढले. परिणामी झिरो बंधारा येथे अडकून पडलेल्या त्या आठ तरुणाच्या आजूबाजूला पाणी वाढले आणि ते अडकले अशी माहिती सूरज गुरव यांनी दिली आहे.

Leave a Reply