IMG-20220711-WA0010
ठाणे ताज्या पालघर महाराष्ट्र मोखाडा सामाजिक

मोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मोखाडा/ सौरभ कामडी :
आदिवासी युवा समाज संघाच्या माध्यमातून इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ रविवार (दि.10 जुलै) रोजी कारेगाव आश्रमशाळा सभागृहात करण्यात आला.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. शिवाय, पुढे शैक्षणिक क्षेत्रात काय केले पाहिजे यांचे देखील उदाहरणं दिली. या प्रसंगी माजी केंद्र प्रमुख श्री राजेंद्र जागेल, माजी सैनिक श्री कोंडू सारकते, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बेबीताई हरिश्चंद्र तेलम, रावजी झुगारे, पांडुरंग ठोंबरे, राजाराम येले, मुख्यध्यापक श्री. घरटे सर, श्री. प्रभाकर शिद, श्री. आनंदा कामडी, श्री. अहिरे सर, श्रीमती मडावी मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply