IMG-20220716-WA0015
ताज्या पनवेल रायगड सामाजिक

रायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम

रायगड जिल्हा परिषदचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवस साजरा; वाढदिवस निमित्ताने राबविले विविध शासकीय उपक्रम

वाढदिवसानिमित्ताने राबविलेले उपक्रम –
• सुकन्या योजना नोंदणी • ई-श्रम नोंदणी • निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना • मुलांसाठी बालसंगोपन • श्रमयोगी योजना • महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप • आरोग्य शिबीर • आधार कार्ड शिबीर • ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपण • १० लाख रूपयांचा मोफत विमा • डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप • करूणेश्वर वृध्दाश्रम भानघर, स्नेहकुंज आधारगृह वृध्दाश्रम नेरे, सिल आश्रम वांगणी येथे अन्नदान वाटप

पनवेल/ प्रतिनिधी :
शेतकरी कामगार पक्षाचे नेते, रायगड जिल्हा परिषदेचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांचा वाढदिवसाच गुरूवारी (दि. १५ जुलै) रोजी विहिघर हनुमान मंदिर येथे साजरा करण्यात आला.
विलासशेठ फडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी १०.०० वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुकन्या योजना नोंदणी, ई-श्रम नोंदणी, निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना, मुलांसाठी बालसंगोपन, श्रमयोगी योजना, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन वाटप, आरोग्य शिबीर, आधार कार्ड शिबीर, ग्रामपंचायत हद्दीमध्ये वृक्षारोपण, लाख रूपयांचा मोफत विमा, डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप, करूणेश्वर वृध्दाश्रम भानघर, स्नेहकुंज आधारगृह वृध्दाश्रम नेरे, सिल आश्रम वांगणी येथे अन्नदान वाटप या सारखे विविध उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे मा. सदस्य विलासशेठ फडके यांनावाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार बाळाराम पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, क्रांतीकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके, उपाध्यक्ष डी. के. भोपी, संतोष पाटील, नरेंद्र भोपी, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा, साप्ताहिक आपले रायगडचे संपादक सुनिल वारगडा, चिपळे ग्रामपंचायतीचे सदस्य धनंजय पाटील, सुनिल ठाकूर, गोपीनाथ पाटील आदी. उपस्थित होते.

Leave a Reply