IMG-20220716-WA0009
खारघर पनवेल सामाजिक

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप

खारघर/ प्रतिनिधी :
येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेमध्ये दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती करुणा यादव शिक्षणाधिकारी नवी मुंबई महानगर पालिका बेलापूर नवी मुंबई व संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर याच्या हस्ते ८२ बौद्धिक दिव्यांगजन मुलाना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्रीमती करुणा यादव मॅडम शिक्षणाधिकारी यांनी बौद्धिक दिव्यांग मुले व पालक याना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमात संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह सर यांनी आपले बौद्धिक दिव्यांगजन मुलांना शैक्षणिक साहित्याचे महत्व आणि केंद्र शासनाच्या योजने बद्दल सांगितले. या कार्क्रमामध्ये संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी प्रशिक्षण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर सावंत व्याख्याता विशेष शिक्षण यांनी केले.

Leave a Reply