IMG-20220716-WA0027
ठाणे ताज्या सामाजिक

पाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली… गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न

पाऊस वादळामुळे झाप गावातील घरे कोसळली

गोविंद वातास, रामदास बात्रे यांचे घरांचे मोठे नुकसान ; नुकसान भरपाई मिळण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे प्रयत्न

मोखाडा/ सौरभ कामडी :
मोखाडा तालुक्यातील झाप ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाप गावात रात्रीच्या पावसामुळे गावातील गोविंद मन्या वातास आणि रामदास चिंतामण बात्रे कोसळली. त्यामुळे त्या दोघांचे ही घराचे खुप नुकसान झाले. याबाबत कार्यकर्त्यांना माहिती मिळताच तत्काळ दूरध्वनी वरून संपर्क करून तलाठी कार्यालयला माहिती दिली. तेव्हा कौलाळे तलाठी सजा श्री. तायडे यांनी येऊन तत्काळ पंचनामा केला व शासनस्तरावर लवकरात- लवकर नुकसान भरपाई मिळेल असे सांगण्यात आले.
यावेळी बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा,उप सरपंच तुकाराम गरेल, युवराज खरपडे, बाळू वातास, योगेश पुराणे, दिलीप दरोडा, रामदास बत्रे, चिंतामण बात्रे उपस्थित होते .

Leave a Reply