IMG-20220725-WA0016
कर्जत ताज्या सामाजिक

घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला

घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला

कर्जत/ नितीन पारधी :
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डिकसळ येथील प्रवीण म्हसे या रिक्षाचालकांची रिक्षा घराच्या बाहेर उभी केलेली असताना चोरीला गेली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथील पोलिसांनी असून सर्व भागातील सर्व सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु केली आहे.
डिकसळ येथील रोहित ढाबा समोर प्रवीण म्हसे हे राहतात आणि ते रिक्षा व्यवसाय करतात.भिवपुरी रोड येथे प्रवासी रिक्षा वाहतूक करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. २४ जुलै च्या रात्री एक ठरलेले भाडे असल्याने रिक्षाचालक प्रवीण म्हसे यांनी आपली MH46 BD3989 या क्रमांकाची रिक्षा कर्जत- नेरळ रस्त्यावर उभी करून ठेवली होती. रात्री आठच्या सुमारास उभी केलेलेही रिक्षा दहा वाजता भाडे घेण्यासाठी घराबाहेर पडल्येल्या म्हसे यांना घराबाहेर दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी आपली रिक्षा आजूबाजूला नेवून उभी केली आहे काय? याची खात्री करण्यासाठी परिसर फिरून रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षा आढळून आली नाही.त्यामुळे आज सकाळी नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन हरवलेल्या रिक्षा बाबत तक्रार दिली. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी श्रीकांत काळे तसेच गणेश गिरी यांनी डिकसळ येथे येऊन सर्व परिसरात माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या भागातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासले आहेत. नेरळ पोलिसांकडून हरवलेल्या रिक्षाचा शोध सुरु केला .

Leave a Reply