IMG-20220727-WA0018
कर्जत कोकण महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

माथेरानला धावली पहिल्यांदा ई- रिक्षा…

माथेरानला धावली पहिल्यांदा ई- रिक्षा…

माथेरान/ नितीन पारधी :
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असेलेले माथेरान हे पर्यटन स्थळ प्रदूषण मुक्त पर्याटन स्थळ आहे येथे दस्तुरी नका ते माथेरानमध्ये जाण्यासाठी वाहनांना बंदी आहे. दस्तुरी नका ते माथेरानला फिरण्यासाठी हातरिक्षा, घोडा तसेच मिनीट्रेन याने प्रवास करावा लागतो .

अनेक वर्षापासून माथेरानमध्ये अमानवी वाहतूक करणारी हातरीक्षाच्या साहायाने माथेरानमध्ये प्रावस केला जात होता, मात्र यामुळे या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. अमानवी वाहतूक करणारी हातरीक्षा हि कायस्वरूपी बंद होणार माथेरानला ई रीक्षा चालू करण्यासाठी श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संस्था या संस्थेकडून ई- रिक्षा मागणी करण्यात आली तसेच ई रिक्षा चाचणी प्रशासननाकडे अहवाल सादर करण्यात आला.
ई- रिक्षामुळे माथेरानमध्ये जे विद्यार्थी ३ ते ४ किलोमीटर पर्यंत प्रावस करत आहेत जर ई- रिक्षा चालू झाली. तर या विद्यार्थी जी पायपिट सहन करावी लागत होती हि मात्र कमी होणार आहे. तसेच माथेरानला जे पर्याटक येतात यांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. माथेरानमध्ये ई रिक्षा चाचणी घेण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक चंद्रकांत माने, संजय पाटील, अजय कराळे तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाते विद्यासागर कील्लेदार, आर एफ कामत तसेच माथेरान co सुरखा भंणगे, माथेरान पोलिस निरीक्षक अधिकारी शखर लव्हे, फॉरेस्ट अधिकारी उमेश जंगम यांच्या माध्यमातून या ई रिक्षांच्या चाचण्या करण्यात आल्या..

माथेरानला ई रिक्षा कशा प्रकारे धावणार :-

दस्तुरी नका ते माथेरान ई रिक्षा दूस्तूरी नाका ते माथेरानला फिरण्यासाठी या रिक्षा मध्ये चार पर्याटक एका रिक्षा मध्ये प्रावास करू शकतात या पेक्षा जास्त पर्याटक प्रवास करू शकत नाही.

Leave a Reply