IMG-20190827-WA0002
ताज्या महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

समाजाने राजकारण विरहित समाजसेवा करावी- प्रसाद सावंत

समाजाने राजकारण विरहित समाजसेवा करावी- प्रसाद सावंत

माथेरान/प्रतिनिधी :
समाज मग तो कोणताही असो आपल्या समाजात समाजोपयोगी कामे त्याचप्रमाणे अन्य सेवाभावी उपक्रम राबविताना त्याला राजकारणाची जोड न देता राजकारण विरहित समाजसेवा केल्यास खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती आणि उन्नती होते असे प्रतिपादन नगरपालिका गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी केले. संत शिरोमणी रोहिदास महाराज नगरातील समाज मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी चर्चासत्रात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की निवडणुका येतात आणि जातात आपण आपल्या जागेवर असतो. सामाजिक बांधिलकी जपताना नेहमीच समाजाला विश्वासात घेऊन प्रत्येक समाज घटकाने पुढे गेल्यास सर्वांगीण विकास नक्कीच होऊ शकतो. श्रावणी सोमवार निमित्ताने येथील समाज मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी लवकरच पूजापाठ, त्यानंतर शिव पिंडीवर दुग्धअभिषेक करण्यात आला. दुपारी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम आणि महिलांनी फुगड्या खेळून कार्यक्रमाला रंगत आणली. याचवेळी समाजाचे जेष्ठ सदस्य ज्ञानेश्वर बागडे यांचा वाढदिवस सुध्दा सर्वांनी मिळून मोठया आनंदाने साजरा केला.
यावेळी चर्मकार समाजाचे नव्याने अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत असलेले अभ्यासू व्यक्तीमत्व सूर्यकांत कारंडे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. नगरसेवक नरेश काळे, राजेश काळे, लक्ष्मण कदम, वसंत बोंबे, नरेश साबळे यांसह अन्य उपस्थित होते.

Leave a Reply