IMG-20220810-WA0016
संपादकीय

पनवेल तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा

पनवेल तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा

समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी गावोगावी काढली बाईक रॅली

पनवेल/ प्रतिनिधी :
संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाला मान्यता १९९४ साली दिली असल्याने आदिवासी समाजामध्ये ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी मेळावे, मोर्चे, सांस्कृतिक कार्यक्रम, जनजागृती करत आदिवासी संस्कृती टिकवण्याची जबाबदारी सर्व आदिवासी कार्यकर्ते करत असतात.
पनवेल तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या – पाड्या आहेत. विशेषतः मालडूंगे, धोदाणी, गाढेश्वर परिसरात हा पनवेल तालुक्यातील आदिवासींचा गाभा असल्याने ९ ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिन साजरा करतांना मालडूंगे येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक (आदिवासी क्रांतिकारक स्तंभ) येथे क्रांतीकारकांना मानवंदना करण्यात आले. नंतर गाढेश्वर येथील ठाकूर समाजाचे क्रांतीकारक पद्या ठाकूर यांनी देखील मानवंदना करून तालुक्यातील आदिवासी समाजाच्यावतीने मालडूंगे, धामणी, देहरंग, बापदेववाडी, धोदाणी व गाढेश्वर परिसरात बाईक रॅली काढण्यात आली. विशेष म्हणजे काढलेल्या बाईक रॅलीमध्ये आदिवासी समाजातील गाणी, जनजागृतीपर गीतांचाच समावेश होता. बाईक रॅली संपन्न होताच धोदाणी गावा ठिकाणी ठराविक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून समाजातील बांधवांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्व पटवून दिले. तसेच आदिवासी समाजातील गायिका उषा वारगडा हिने आदिवासी समाजामध्ये जनजागृती होण्यासाठी प्रबोधनपर गीत गायलं.
शिवाय, जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मालडूंगे ग्रामपंचायतचे सहकार्य असल्याने सरपंच हर्षदा चौधरी यांच्यासह ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोलीस पदू दोरे, काळूराम वाघ, सी.के. वाक, सोमनाथ चौधरी, पञकार गणपत वारगडा, सिताराम चौधरी, धर्मा वाघ, महादू जाधव, राम भस्मा, चंद्रकांत सांबरी, संजय चौधरी, जनार्दन निरगुडा, पद्माकर चौधरी, सुनिल वारगडा, नारायण चौधरी, सिताराम वारगडा, रमेश भस्मा, आर.डी.वाक, जर्नादन घुटे, गौरव दरवडा, रवी पाटील, किरण ढुमणा, विलास भस्मा, अर्जुन घुटे, शाम चौधरी, राजाराम चौधरी आदी. उपस्थित होते.

 

Leave a Reply