IMG-20190830-WA0066
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल…

पनवेल/ प्रतिनिधी:
विद्यार्थ्यांना लाकडी पट्टीने मारहाण करणा-या शिक्षकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब पानगे असे शिक्षकाचे नाव असून ते धोदाणी येथील शाळेत कार्यरत आहेत. प्रीती दोरे (8 वर्षे) व सतीश बुध्या पारधी (8 वर्षे) हे दोघेही धोदाणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकत आहेत. गुरूवार, 29 ऑगस्ट रोजी शाळेतील शिक्षक बाळासाहेब पानगे यांनी या दोघांना लाकडी पट्टीने जबर मारहाण केली.
यावेळी प्रीती हिच्या आईने शाळेत जाऊन चौकशी केली असता दोन्ही विद्यार्थ्यांच्या पाठीवर लाकडी पट्टीने वण्र दिसले. शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारहाण करीत असल्याचे यावेळी मुलांनी सांगितले. याप्रकरणी शुक्रवारी पानगेविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी आदिवासी संघटनचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.

One thought on “धोदाणी येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल

Leave a Reply