IMG-20190916-WA0134
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण रायगड सामाजिक

शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या

शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या

पनवेल/प्रतिनिधी :
शेतकरी कामगार पक्ष पनवेल व पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून फ्लिपकार्ट कंपनीसाठी पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली भागात डिलिव्हरी बॉयकरिता १६ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० जणांना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी मिळाली आहे.
फ्लिपकार्ट या नामांकित कंपनीला पनवेल परिसरात डिलिव्हरी बॉय म्हणून माणसांची गरज होती. या बेरोजगार तरुणांना प्रीतम म्हात्रे यांनी रोजगारची संधि उपलब्ध करून दिली आहे. विश्राळी नाका येथील गुरुषरणम कॉम्प्लेक्स मधील शेकापच्या पक्ष कार्यालयात सकाळी ११ ते २ या वेळेत ईछुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी ३० जणांना नोकरी मिळाली असल्याची माहिती रोहन गावंड यांनी दिली. या नोकरीमुळे उमेदवारानी विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply