hfesdgartkyj16-09-2019(1)
नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अजयकुमार लांडगे

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अजयकुमार लांडगे

पनवेल/ प्रतिनिधी :
तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजय कुमार लांडगे जून 2018 पासून तळोजा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कार्यरत होते. दरम्यान, काशिनाथ चव्हाण यांची तळोजा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
पनवेल शहर येथील नवनियुक्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची अत्यंत कडक शिस्तीचे पोलिस अधिकारी म्हणून विशेष ओळख आहे. दरम्यान, तळोजा येथे नियुक्ती करण्यात आलेले काशिनाथ चव्हाण हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात विशेष शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून काम पहात असून त्यांची बदली तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे पनवेल शहर प्रशासन पोलीस निरीक्षक म्हणून शत्रुघ्न माळी यांची वर्णी लावण्यात आली आहे. कामोठे शहर वपोनि पदी बाळासाहेब तुपे तर गुन्हे शाखा पोनि पदी विमल बिडवे यांची वर्णी लावण्यात आली आहे. कामोठा पोलीस ठाण्याचे पो.नि.मधुकर भटे यांची नवीन पनवेल वाहतूक शाखा येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीबीडी वाहतूक शाखेच्या रिक्त जागेवर भाऊसाहेब गायकर यांची बदली करण्यात आली आहे.

Leave a Reply