20190918_134437
उत्तर महाराष्ट्र कोकण ताज्या नवी मुंबई नाशिक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र सामाजिक

‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला…. आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल

‘टिक – टाॅक’ व्हिडिओ भोवला

आदिवासी मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद केल्या प्रकरणी अॅट्राॅसिटी गुन्हा दाखल

नाशिक/ प्रतिनिधी :
पंचवटी परिसरात राहणा-या जोडप्याने आदिवासी समाजाच्या मुली व महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद करत टिक टाॅक व्हिडिओ व्हायरल झाल्याने या टिक टाॅक व्हिडिओ वर आक्षेप घेतला आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्यात आदिवासी समाज बांधवांनी धाव घेऊन या जोडप्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. टिक टाॅक व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजाची बदनामी झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. म्हसरूळ पोलीसांनी सोमवारी त्या जोडप्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वे (अॅट्राॅसिटी) गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, एका नवविवाहित जोडप्याने शनिवार एक टिक टाॅक व्हिडिओ तयार करत तो सोशल मिडियावर व्हायरल केला होता. सदर व्हिडिओत तरूणी आदिवासी समाजातील मुलींविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करताना दिसते. या चिञफितीवरूध्द महाराष्ट्र राज्यभर वादंग उठले. विविध पोलीस ठाण्यात या जोडप्याविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाशिक येथील लकीभाऊ जाधव, इंजि. गणेश गवळी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हसरूळ पोलीसांनी गीतांजली राहुल परदेशी व तीचे पती राहुल किशोर परदेशी या दोघांविरूध्द अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने (अॅट्राॅसिटी) गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply