IMG-20190922-WA0030
कर्जत ठाणे ताज्या नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक

नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…

नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…

आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष बुधाजी हिंदोळा (तात्या) यांचा पुढाकार

नेरळ/ प्रतिनिधी :
नेरळ परिसरातील भागुचीवाडी (कळंब) येथील आदिवासी तरुण शंकर हरि निरगुडा हा आपले घरातील गायी- बैल व गुरे चारण्यासाठी गावाच्या बाजूला गेला होता. शंकर गुरे चारत असताना बुधवार (दि.18 सप्टेंबर) सांयकाळी ०५: ३० च्या दरम्यान वीजा चमकत होती. ही वीज अचानक भागुचीवाडी येथील असणारा शंकर यांच्या अंगावर ही वीज पडली. या विजेच्या झटक्याने शंकर खाली कोसळून त्याचे अंग भाजले व शंकर गंभीर जखमी झाला. तसेच या विजेच्या झटक्याने शंकरच्या अंगावर अनेक चट्टे पडून आहेत.
याकरिता शंकर निरगुडे यांची परिस्थिती पहाताच समाजाचे जेष्ठ समाजसेवक तसेच कर्जत सह्याद्री आदिवासी ठाकूर- कातकरी विकास संघटनेचे खजिनदार, आदिवासी ठाकूर-ठाकर नोकरवर्ग रायगड जिल्हा सचिव तसेच आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था उपाध्यक्ष बुधाजी सखाराम हिंदोळा(तात्या) यांनी रोख रक्कम रु.५०००/- पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
यावेळी सह्याद्री आदिवासी ठाकूर कातकरी विकास संघटनेचे अध्यक्ष भरत शिद, मा. अध्यक्ष जैतू पारधी, उपाध्यक्ष मंगळ केवारी, महिला अध्यक्ष रेवती ढोले, मा. खजिनदार संत ढोले (सर), मधुकर ढोले, कांता पादीर, रमेश बांगारा, जगन पादीर, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply