IMG-20190924-WA0009
ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

समाजात होणा-या अन्यायाला वाचा फोडून आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ ! नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मारुती भवारी यांची ग्वाही

पुणे/ प्रतिनिधी :
आदिवासी समाजाच्या अडी अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आदिवासी समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पञकार गणपत वारगडा यांनी 2013 साली आदिवासी सेवा संघाची स्थापना करून आदिवासी समाजाचे काम करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्यक्षेत्र ठरवले.
पाणी व रस्त्यांचे प्रश्न, आदिवासी जमिनी व वनजमीनीचे प्रश्न, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, आदिवासींना असणा-या सोयी – सुविधा मिळण्यासाठी केलेले प्रयत्न या आरखे अनेक कामे आदिवासी सेवा संघाच्या वतीने रायगड, नवी मुंबई व ठाणे जिल्हातील काही आदिवासी भागामध्ये कामे करण्यात आली. या संघामध्ये जोडलेले सर्व कार्यकर्ते प्रामाणिक पणे काम करत संघाचा विस्तार वाढवत आहेत. दरवर्षी संघाच्या वतीने कामे केली जातात, हे कामांचा आढावा पहाण्यासाठी आदिवासी सेवा संघाचे आदिवासी दिनदर्शिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचत असतं. म्हणूनच आदिवासी सेवा संघाची पुणे जिल्हा कार्यकारणी होण्यासाठी पुणे जिल्हातील कार्यकर्ते नेहमी विचारपुस करून पुणे जिल्हा कार्यकारणी होण्यासाठी आग्रही होते. अखेर आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्रचा विस्ताराच्या हेतूने आणि आदिवासी समाजातील लोकांना न्याय- हक्क मिळवून देण्यासाठी अखेर पनवेल येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये बैठक व चर्चा करून आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र यांची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या पुणे जिल्हा कार्यकारणीमध्ये चंद्रकांत मारुती भवारी हे अध्यक्ष, अविनाश अशोक मुंढे उपाध्यक्ष, अनिल भिकाजी पारधी सचिव, तर चंद्रकांत ज्ञानेश्वर सुपे यांची सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आले असून त्यांना आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष तथा पञकार गणपत वारगडा यांच्या हस्ते नियुक्तीपञ देखील देण्यात आले आहे.
यावेळी आदिवासी समाजात होणा-या अन्यायाला वाचा फोडून आदिवासी समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देऊ तसेच दिलेल्या पदाचा योग्य प्रकारे वापर करून समाज प्रबोधन व संघटीत करण्याचे काम करू असे नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत मारुती भवारी याप्रसंगी बोलत होते.

Leave a Reply