महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार…
न्यायप्रिय,”महात्मा राजा रावण दहन प्रथा” कायमस्वरूपी बंद करा !
…………………………………..
वास्तविक राजा रावणा सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही. तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर महात्मा राजा रावणाची पुजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहे. परंतू आदिवासींच्या या समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा उद्गाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात.
………………………………………
ठाणे- रायगड/ विशेष प्रतिनिधी :
महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या,वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा असून महात्मा राजा रावण हे विविध गुणांचा समुच्चय आहे. महान दार्शनिक , संगीततज्ञ, राजनितीज्ञ, शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट, नगररचनाकार, समताधिष्ठित, समाज व्यवस्थेचा उद्गाता, साहित्यिक, न्यायप्रिय राजा असून देवांचा देव शंकराला प्रसन्न करणारा पहिला भक्त,अशा अनेक गुणांचा अविष्कार करणारा महात्मा राजा होता. अशा महान राजाला इथल्या षडयंत्रकारी, वर्णांध व्यवस्थेने, बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवली गेली नाही. त्यांस खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे. परंतू सत्य लपून राहत नाही. ते कधी ना कधी उघड होतेच. आदिवासी समाजातील व इतरही समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे.
आदिवासी समाजामध्ये प्रचंड जनजागृती होत असताना दस-याच्या दिवशी जर का? रावण दहन करण्याचा प्रयत्न केला, तर सर्व आदिवासी समाजाकडून तिव्र स्वरुपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल. आमच्या आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील. त्यामुळे आदिवासी समाजाचे न्यायप्रिय राजाचा अपमान करणा-या लोकांविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३,१५३(अ),२९५,२९८ मुंबई पोलीस अँक्ट नुसार १३१,१३४,१३५ कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
आमच्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां कविता निरगुडे यांनी ठाणे – रायगड जिल्हाधिकारी यांना पञ दिले असून त्या पञाचा संदर्भ ठाणे, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधित सर्व तालुक्यातील पोलीस अधिका-यांना सुचना देण्याची विनंती सुद्धा केली आहे. त्यामुळे महात्मा रावणाचे दहन कराल तर अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत (ऑट्रोसिटी) गुन्हा दाखल होणार असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे व आवश्यक आहे.
Rajkarran karu Nka…..
Ravan kon hota he sarve lokana mahit ahe…..
Dusrya jagevar froud kra ya mettar var nahi…….
Tumchya var adhi gunna dakhal kela pahije pahile…..
Hindu ahe ka re tumhi….. ?