IMG-20191002-WA0028
ठाणे ठाणे ताज्या नवी मुंबई मुरबाड रायगड

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप….

2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप….

आदिवासी लोकसेवा संस्थेचा उपक्रम

मुरबाड/ प्रतिनिधी :
मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद करपटवाडी शाळेत आदिवासी लोकसेवा संस्थेच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जंयतीचे औचित्य साधून करपटवाडी येथील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खाऊचे सुद्धा वाटप करण्यात आले.
आदिवासी लोकसेवा संस्थेच्या वतीने महात्मा गांधीजी व लालबहाद्दूर शास्त्री या महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. शाळेच्या शिक्षिका वंदना बांगर, संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर यांनी करपटवाडीतील विद्यार्थ्यांना या महापुरूषांच्या विषयी महत्व पटवून दिवून महात्मा गांधीजी व लालबहाद्दूर शास्त्री यांचा इतिहास उपस्थितांना सांगितले. नंतर जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देत शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
यावेळी संस्थेचे सचिव बारकू वाघ, उपाध्यक्ष मालोजी मेंगाळ, खजिनदार मोहन भला, संचालक नाना खाकर, जयराम वाघ, भास्कर भला, व गावातील माजी उपसरपंच नथू पारधी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply