IMG-20191011-WA0010
कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल राजकीय रायगड

यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार – महेंद्र थोरवे

यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार.!- महेंद्र थोरवे.

कर्जत/ प्रतिनिधी :
कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी गेल्या पाच वर्षात गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले नसून कर्जतची जनता विकासकामांपासून वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केले. कर्जत येथे आयोजित पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते.
2014 च्या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. परंतु आगामी निवडणुकीत लोकांचा मिळणार प्रतिसाद आणि मोठ्या संख्येने होणारे पक्षप्रवेश पाहता महेंद्र थोरवे विक्रमी मताधिक्याने निवडून येतील असे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
गेली 15 वर्षे विरोधकांची सत्ता होती व विरोधी पक्षाचा आमदार याठिकाणी होता तरीही अपेक्षित असणारा विकास कर्जत मध्ये कधी पाहायला मिळाला नाही त्यामुळे केवळ गोरगरिबांच्या हितासाठी मा.पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जनतेची सेवा करण्यासाठी मला उमेदवारी दिली असल्याचे वक्तव्य यावेळी महेंद्र थोरवे यांनी केले.
कर्जत परिसर हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम असून याठिकाणी आदिवासी वाडी वस्तीवर भीषण पाणी टंचाई जाणवते, महिलांना पाण्यासाठी दुर्गम भागातून पायपीट करावी लागते त्यामुळे विद्यमान आमदारांनी पाण्यासारख्या मूलभूत सोयी दिल्या नसल्याने सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न मार्गी लावेन असे आश्वासन थोरवे यांनी दिले त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात असंख्य सुशिक्षित बेरोजगार असून त्यांच्यासाठी रोजगारनिर्मिती करण्यासाठी मी सर्वप्रथम कटिबद्ध असेन असेही ते पुढे म्हणाले.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीप्रमाणे 80% समाजकारण व 20% राजकारण हे धोरण समोर ठेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये व महायुतीच्या घटकपक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असून भाजपचे कार्यकर्तेही खांद्याला खांदा लावून जोमाने काम करत आहेत म्हणूनच यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात तिळमात्रही शंका नाही असा ठाम विश्वास महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply