IMG-20191015-WA0001
खारघर ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये…

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये…

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२ वाजता खारघर येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, पालकमंत्री व डोंबिवलीचे उमेदवार रविंद्र चव्हाण, पेणचे उमेदवार रवीशेठ पाटील, ऐरोलीचे उमेदवार गणेश नाईक आणि बेलापूरच्या उमेदवार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रचारार्थ हि जाहीर सभा खारघर मधील सेक्टर २९ येथील सेंट्रल पार्क जवळील भव्य मैदानावर होणार आहे.

Leave a Reply