20191025_091530
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी.., सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक 

पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी

सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक 

पनवेल/ प्रतिनिधी :
तब्बल ९२ हजार ३७० मतांची ऐतिहासिक आघाडी घेत कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली. कोकणातील सर्वात जास्त मताधिक्याचा हा दणदणीत विजय झाला. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना ०१ लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. विशेष म्हणजे शेकापच्या उमेदवाराला तिसऱ्यांदा चारीमुंड्या चित्त केले. त्यामुळे पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी साजरी झाली. हा विजय म्हणजेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वसामान्य व सर्व समाजातील घटकांचा विचार करून केलेल्या विकासाचा झाला. विरोधकांनी प्रचाराच्या अनेक लुप्त्या केल्या मात्र विकासपुरुष असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांनी पुन्हा पसंती दिली. संपूर्ण पनवेल ‘एकच वादा प्रशांतदादा’ या गर्जनेने दणाणून गेला होता. आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणार याची सर्वानीच खात्री दिली होती फक्त मतांची आघाडी किती असेल याचीच प्रतिक्षा होती आणि तब्बल ९२ हजारांच्या मतांची आघाडी घेऊन कोकणातील सर्वात मोठा विजय.
विजयानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी मतदार, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. तर सर्वानी त्यांचे अभिनंदन केले. जागोजागी औंक्षण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजय हा सर्वसामान्य माणसाचा विजय झाला, त्यामुळे आपणच जिंकलो असा उत्सवी वातावरण सर्वामध्ये पाहायला मिळत होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना केलेल्या कामांमुळे पनवेलच्या विकासाचा आलेख कायम उंचावत राहिला, म्हणूनच आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांनी भरभरून कौल दिला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.
प्रचारावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदार नागरिकांनाचा उदंड प्रतिसाद लाभला होता. जिकडे तिकडे प्रशांत ठाकूर या नावाने झंझावात निर्माण केला होता. त्यामुळे विजयाचे चित्र त्याचवेळी स्पष्ट झाले होते, फक्त विजयाची औपचारिकता घोषणा बाकी होती. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि मतदार राजाचा आशिर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना मिळाला.

Leave a Reply