20191109_203439
ताज्या नेरळ माथेरान सामाजिक

सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने उत्पन्नाचे साधन..! गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात

सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केल्याने नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन..

गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर करता येते मात.

माथेरान/ प्रतिनिधी :
माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने इथे पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्ततः पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात इथे सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती. दरवेळी स्वच्छ सर्व्हेक्षण वेळीच गावातील कचऱ्याचे मोठया प्रमाणात संकलन करून डंपिंग ग्राऊंडवर नेला जायचा. तर अनेकदा या प्लास्टिक अन्य भागातून येणाऱ्या महिला या प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या विक्रीसाठी नेत असत, याचाच लाभ त्याना होत होता.
परंतु स्वच्छता दूत म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे असे कार्यतत्पर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रभारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर अनेक सकारात्मक कामे पूर्ण करताना या टाकाऊ बाटल्यांचा नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन म्हणून सदुपयोग केला आहे. नगरपरिषदेच्या कचरा वेचक महिला,आणि सफाई कामगार हे नियमितपणे गावातील लाॅजिंग तसेच हॉटेलमध्ये जाऊन सर्वच प्रकारचा कचरा संकलन करीत असतात. या प्लास्टिक बाटल्या मशीनमध्ये बेलिंग करून जवळपास एक हजार बाटल्या गोणीत भरून विक्रीसाठी भंगारवाले कंपनी मध्ये नेत आहेत. चार महिन्यापासून या माध्यमातून तीस हजार रुपयांचे उत्पन्न नगरपरिषदेला प्राप्त झाले असून अद्याप पंचवीस वर्षे रुपयांचा हा माल शिल्लक आहे.

————————————-
स्वच्छते बरोबर येथे मोठ्या प्रमाणावर साठत असलेल्या सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केली जात आहे यातूनच नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन मिळत आहे. त्यामुळे गावात स्वच्छता आणि प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर मात करता येईल.
– प्रसाद सावंत – गटनेते,
बांधकाम सभापती माथेरान नगरपरिषद
—————————

Leave a Reply