20191111_101545
उरण ताज्या रायगड सामाजिक

आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू

आदिवासी समाजातील महिलांना भाऊबीज म्हणून साड्यांची भेट वस्तू

ठाकर व कातकरी समाज महिलांना भाऊबीज म्हणून 67 नव्या साड्यांची भेट तर आदिवासी बांधवाना 75 मिठ्ठाईचे बाँक्स वाटप

उरण/ प्रतिनिधी :
दीपावलीच्या शुभ पर्वावर उरण मधील प्रसिद्ध समाजसेवक संग्राम तोगरे व संग्राम तोगरे यांच्या पत्नी सुमनताई तोगरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून डाऊरनगर (उरण) येथील आदिवासी ठाकर व कातकरी समाज बांधवांस भाऊबीज भेट म्हणून 67 नव्या साड्या व 75 मिठ्ठाईचे बाँक्स वाटप करण्यात आले. या अभिनव कार्यास शिवाजी सेवा मंडळ मुंबई या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिनेश शेलार, सचिव अमिनभाई शेख, खजिनदार जितेंद्र यादव आणि कर्तबगार 14 सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, लहु-अण्णा सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पवार, मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या  अध्यक्षा सुमनताई तोगरे, सचिव अनिता धनगर, खजिनदार जिजाबाई कांबळे, लिंबाबाई तथा नीलम पारधी उपस्थित होते.

Leave a Reply