20191111_101850
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

स्थानिक कुष्ठरोेगांकरिता मलमपट्टी सुविधा द्या!

नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी केली आयुक्तांकडे मागणी

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही.
शांतीवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य होत नाही. शिवाय प्रवासाने जखमा खराब होवून त्यातून पाणी येते. तरी पनवेल महानगरपालिकेने या रुग्णांची व्यथा जाणून त्यांना मलमपट्टी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कुष्ठ रुग्णांकरिता मलमपट्टी सुविधा सदर वसाहतमध्ये 8 दिवसातून दोनदा करता यावी. त्यासाठी योग्य ते डॉक्टर अथवा सेवक, सेविकेची व्यवस्था करावी. या गोष्टीचा सहानुभूती पूर्वक विचार व्हावा अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी केली आहे.

Leave a Reply