20191121_112950
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल तालुका पोलिसांनी राबविला स्टुण्डंट ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड चाईल्ड अ‍ॅक्युझन उपक्रम

पनवेल तालुका पोलिसांनी राबविला स्टुण्डंट ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड चाईल्ड अ‍ॅक्युझन उपक्रम

पनवेल/ प्रतिनिधी :
श्री रंगनाथ पाटील एज्युकेशनल ट्रस्टच्या शाहिर बाळाराम पाटील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगडे येथे शालेय विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्टुण्डंट ह्युमन राईटस् अ‍ॅण्ड चाईल्ड अ‍ॅक्युझन हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी बालकांचे हक्क व सुरक्षितता या संदर्भात माहिती उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना देण्यात आली. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोपाळ, यांनी बालगुन्हे संदर्भात माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कालिदास शिंदे यांनी उपस्थित मुलींना कल्याणी योेजना आणि गुड टच, बॅड टचची माहिती दिली. महाराष्ट्र शासनाने एक आखलेल्या उपक्रमाबद्दल सर्वांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास संस्थापक रंगनाथ पाटील, पोलीस नाईक, अधिकारी, ए.एस.आय.आव्हाड आदींसह जवळपास हजार विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply