20191214_134641
अलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कोकण कोल्हापूर खारघर गडचिरोली चिपळूण ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नाशिक नेरळ पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे पुणे पेठ पेण मराठवाडा महाराष्ट्र माथेरान मुंबई मुरबाड रत्नागिरी रत्नागिरी रायगड वसई विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ

‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना

समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ

आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा


विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी :
दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या निमित्ताने शहरी ठिकाणी गेलेल्या कुटुंबाना लग्न सराईत सहभागी होता येत नाही. याचा परिणाम हळूहळू त्यांच्या कुटुंबावर होत असतो. आपल्या कुटुंबात मुले व मुली मोठी होत असतांना त्यांना वर निवडणे, वधू सुचवणे यांचा मिलन होणे अवघड होत असते.


त्यामुळे आदिवासी समाजातील 45 जमातींना वधू- वर योग्य प्रकारे निवडण्यासाठी तसेच त्यांचे शिक्षण पाञतासह करियर संदर्भात माहिती सहज मिळण्यासाठी ‘नाते दोन मनाचे- जोडतो धागे आयुष्याचे’ या उक्तीप्रमाणेच ‘आदिवासी’ वधु – वर सुचक केंद्राची स्थापना रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी केली आहे.

आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांच्या कुटुंबाना यांचा मोठा फायदा होणार आहे. कारण, कामानिमित्ताने व शहरी ठिकाणी असलेल्या कुटुंबातील मुले व मुली ह्या मोठ्या प्रमाणात शिकलेल्या असतात. माञ यांचा संबंध गावाकडे क्वचितच येत असल्याने त्यांना आपल्या पाञतेनुसार वधु- वर निवडता येत नाही. त्यामुळे आयुष्याचे पक्के धागे जोडता येत नसल्याने समाजातील अनेक नोकरदार वर्गांनी व्यथा मांडल्या.
याच उद्देशाने समाजामध्ये दोन मनाचे नाते जोडण्यासाठी आदिवासी वधु- वर सुचक केंद्राची स्थापना केल्याने अधिकाधिक वधु- वरांनी नोंदणी करावी, असे आवाहन ‘आदिवासी’ वधु – वर सुचक केंद्राचे संचालक गणपत वारगडा यांनी केले आहे. तसेच नोंदणी केलेल्या वधु- वरांची माहिती गोपनीय ठेवली जाईल असेही सांगितले आहे.
——————————————————

नाते दोन मनाचे, जाडते धागे आयुष्याचे..

👩‍❤‍👩 *’आदिवासी’ वधु – वर सुचक केंद्र* 👨‍❤‍👨

● समाजातील फक्त ४५ जमाती करिता ●

संचालक – श्री. गणपत वारगडा.
[अध्यक्ष, आदिवासी सेवा संघ (रजि.]
संपर्क : 📲 9820254909 [whatsApp]

पत्ता :- रूम नं. 7, भाग्यश्री अपार्टमेंट, आदिवासी नगर, काप्रोली. पो. चिपले, ता. पनवेल, जि. रायगड. पिन ४१०२०६.

टिप : लवकरात लवकर नाव व नोंदणी करा, अटी शर्ती लागू.

Leave a Reply