20200105_233922
अलिबाग कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कु. योगिता पारधी यांची निवड झाल्याने जिल्हाभर आदिवासी संघटनांचा होतोय शुभेच्छांचा वर्षाव…

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी कु. योगिता पारधी यांची निवड झाल्याने जिल्हाभर आदिवासी संघटनांचा होतोय शुभेच्छांचा वर्षाव…

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने देखील दिल्या योगिता पारधीला शुभेच्छा

सुनिल वारगडा / पनवेल :
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाकरिता अनुसूचित जमाती महिला आरक्षण पडल्याने या रायगड जिल्हा परिषदेवर कु. योगिता पारधी यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने योगिता पारधीचा सर्व स्तरावर अभिनंदन केले जाते.

विशेष म्हणजे रायगड जिल्हा परिषदेवर खुप वर्षांनी हे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती आरक्षण पडल्याने रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच महिला आरक्षण असल्याने योगिता पारधीच रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होतील हे सर्वांचे स्वप्न होते. आज आदिवासी समाजातील सुशिक्षित मुलगी ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्याने योगिता पारधी हिचे अभिनंदन करण्यासाठी सर्व समाज एकञ येत असल्याचे दिसून येत आहेत.

योगिता पारधी या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याने आदिवासी संघटनांकडून विशेष अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देखील दिल्या. यावेळी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष व संपादक गणपत वारगडा, पनवेल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सिताराम चौधरी, मालडूंगे ग्रामपंचायतचे मा. उपसरपंच मंगेश चौधरी, आदिवासी न्यूज अॅण्ड इंटरटेंमेट यु ट्यूब चॅनेलचे उपसंपादक सुनिल वारगडा, धोदाणी गावातील जेष्ठ कार्यकर्ते शंकर घुटे, मा. उपसरपंच मैद्या चौधरी, जगन पारधी आदी. उपस्थित होते.

Leave a Reply