ताज्या दादर

जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योगजकांना उद्योगरत्न पुरस्कार जाहीर

जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योगजकांना उद्योगरत्न पुरस्कार जाहीर

दादर/ प्रतिनिधी :
जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या रोप्यमहोत्सवी वर्षा निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज तर्फे उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेत असलेल्या उद्योगकांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येणार आहेत. हा उद्योगरत्न पुरस्कार सोहळा आज बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२० सायंकाळी ६ वाजता स्वातंत्रवीर सावरकर सभागृह येथे होणार आहे.
या सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे तसेच या सोहळयास माननीय आदित्य ठाकरे मंत्री हे विशेष अतिथी असणार आहेत. तसेच माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी, कार्याध्यक्ष मा. खासदार शिवाजी अढळराव, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश कोठारे, जागतिक मराठी चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे संचालक प्रकाश चिखलीकर, रवींद्र आवटी, प्रवीण शेट्ये, सुधीर सामंत, सरचिटणीस तुषार देशमुख, चिटणीस परशुराम पाटील, कोष्याध्यक्ष मनोहर साळवी, सुरेश महाजन तसेच सी. ए. प्रसन्न रेगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वर्षी उद्योगरत्न पुरस्कार हा बडवे ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक बडवे ग्रुप ऑफ कंपनीज श्रीकांत बडवे, संस्थापक व उत्पादक श्रीनिवास इंजि. ऑटो कॉम्पोनेटसचे प्रा. लि. श्री जी. एस. काळे, संस्थापक आणि संचालक, अब्दुला अँड असोसिएटेट, दुबई, यू.ए.ई., अशोक वर्तक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे तसेच प्रो. अनंत एन्टरप्रायझेस शिला धारिया यांना जाहीर केला असून विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात सुरमयी सानिया पाटणकर यांच्या ठुमरी, गज़ल, आणि नाट्यसंगीताने होणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरही यावेळी उपस्थित राहतील.

Leave a Reply