20200216_095551
ताज्या पनवेल सामाजिक

पत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार

पत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार

पनवेल/ प्रतिनिधी :
युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळा देविचा पाडा येथे 16 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार मयूर तांबड़े याना स्व. भरत कुरघोड़े जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
युथ फोरम सोशियल असोसिएशनचाच्या वतीने सामाजिक बांधिलकी या नात्याने प्रबोधन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या परिसरातील नामवंतांना 16 फेब्रुवारी रोजी गौरविण्यात येणार आहे. आयडियल पब्लिक स्कूलसमोर, देविचा पाडा (तळोजा) येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार मयूर तांबड़े यांना स्व.भरत कुरघोड़े जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply