IMG-20200303-WA0017
ताज्या नेरळ रायगड सामाजिक

रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड

रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड

नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे :
रायगड जिल्हामध्ये आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, आदिवासी ठाकूर समाजाच्या अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे समाज कुठे तरी एकञ यावं आणि समाजाचे प्रश्न सोडविण्यात सोयीस्कर व्हावे, म्हणून रायगड जिल्हात आदिवासी समाजाची कार्यकारीणी तयार करण्यासाठी रविवार, (दि. १ मार्च) रोजी पेण तालुक्यातील बापुजी देवस्थान सावरसई (गौळणवाडी) येथे सभा घेण्यात आली.

या सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करून ठाकूर समाजाचा रायगड जिल्हा अध्यक्ष निवडण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात आदिवासी ठाकूर समाजाची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने अध्यक्ष पद कर्जत तालुक्यातील सागाचीवाडी येथील रहाणारे मालू निरगुडे यांना देण्यात आले.
तसेच मालू निरगुडे यांची एकमताने निवड झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दामा ठोंबरे, वामन वाघ, परशुराम दरवडा, जोमा दरवडा, दत्तात्रेय निरगुडे, वाय. के. वारगुडे, लक्ष्मण निरगुडा, हरेश वीर, आनंता वाघ, बबन हिरवे, राम लेंडी, जोमा ठाकरे, धर्मा वाघ, सदानंद शिंगवे, चंद्रकांत सांबरी, वामन ठोंबरे आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.

One thought on “रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड

  1. आदिवासी सम्राटचे सन्मानीय संस्थापक अध्यक्ष श्रीमान गणपतजी वारगुडे साहेबांचे आभार आणि धन्यवाद
    वारगुडे साहेब नेहमीच समाजीज प्रश्नावर अग्रस्थानी असतात धन्यवाद

Leave a Reply