20200304_131118
ठाणे ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र सामाजिक

माची प्रबळगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाचवलं एका पर्यटकाचा जीव

माची प्रबळगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाचवलं एका पर्यटकाचा जीव

पनवेल/ सुनिल वारगडा :
पनवेल तालुक्यात असणारे प्रबळगड व कलावंती दुर्ग पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात. त्यामुळे कलावंती दुर्ग व प्रबळगडाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आग्रह स्थानी दिसत आहे.

कलावंती दुर्ग व प्रबळगड पाहण्यासाठी रविवार (दि.१ मार्च) अहमदनगर येथील पर्यटक आले होते. ते पर्यटक गडावर फिरता फिरता त्यातील एका पर्यटकाला मधमाश्या चावल्याने त्या पर्यटकांची खुप बेकार अवस्था झाली होती. आशा वेळी प्रबळगड व कलावंती दुर्ग गडावर कार्यरत असणारी संयुक्त वन व्यवस्थापन समिती अहमदनगरच्या पर्यटकाच्या मद्दतीला धावली. या पर्यटकाला मधमाश्यांच्या संकटातून सुटका करून त्या पर्यटकाला तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रात समितीच्या सदस्यांनी दाखल केले व उपचारास सुरुवात करून त्या पर्यटकाचा जीव संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाचवलं.

या पर्यटकाच जीव वाचवल्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग पारधी, निलेश भुतांबरा, बाळू भुतांबरा, लक्ष्मण शिद, आनंता शिद यांच्यासह सर्व समितीचे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन श्रीगोंदा अहमदनगर यांनी आभार मानले आहे.

Leave a Reply