ताज्या पनवेल सामाजिक

टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा…मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई

टाळेबंदीच्या काळात मद्य विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हाँटेलवर पोलिसांचा छापा

  • वाहनासह केला तब्बल साडेदहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • मद्य खरेदी करणाऱ्यांवर पनवेल शहर पोलिसांची कारवाई
  • पनवेल शहर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल

पनवेल/ प्रतिनिधी :
टाळेबंदी कालावधीत अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्या पनवेल बस स्थानकाच्या बाजूलाच असणाऱ्या हॉटेल दत्ता इन या बार विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये बियरचे छोटे मोठे टिन व काचेच्या बाटल्या मिळून एकूण १८७, ब्रीझर ५७, वाईन २३ तसेच सिग्नेचर व्हिस्की एकूण ८ बाटल्या (१८०मिली) असा मुद्देमाल अंदाजे ५३ हजार १५ रुपये आणि हुन्डाईची क्रीटा कार (किंमत १० लाख रुपये) असा एकूण १० लाख ५३ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावेळी मद्य विक्री करणाऱ्यासह दोघा गिऱ्हाईकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्व प्रकारच्या मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अवैध मार्गाने विक्री करणाऱ्या पनवेलमधील दत्ता हॉटेल या व्यावसायिकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा राऊत, पोहवा आयरे, पोहवा थोरात, पोना अमोल वाघमारे, पोना मोरे, पोशि गर्दनमारे, पोशी यादवराव घुले यांनी कारवाई केली. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हॉटेल दत्ता ईनचा मालक प्रमोद विठ्ठल शेट्टी (५५, रा.मिडलक्लास सोसायटी, पनवेल) याच्यासह गिऱ्हाईक असलेले रमण बोहरा (५५) आणि जगदीश गायकर (५२) दोघेही रा.पनवेल अशा एकूण तिघाजणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा.दंड.वि.कलम १८८ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन एकीकडे गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, यावेळी जनतेचे हाल होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा सुरु ठेवला असून या कारणास्तव घरातील एकानेच घराबाहेर पडण्याची अनुमती दिलीअसली तरी नागरिकांनी रोजच्यारोज बाहेर पडण्याची गरज किंवा बाहेरच न पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. असे असतानाही हॉटेल दत्ता ईन या व्यावसायिकाने बेफिकीरपणा दाखवीत ओळखीच्या नागरिकांना अवैध पद्धतीने मद्यविक्री करीत असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे यांना समजताच त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल दत्ता ईन येथे छापा टाकला. यावेळी दत्ता हॉटेलचा मालक प्रमोद विठ्ठल शेट्टी हा अवैध मद्यविक्री करीत असल्याने त्याच्यावर रंगेहाथ छापा मारण्यात आला. यावेळी शासनाचे आदेश जुगारून अटी व शर्थीचे पालन न केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

40 + = 45