माथेरान शहर कॉग्रेस पक्षाकडून वृक्षसंवर्धनाचे कार्य
झाडे लावा – झाडे जगवा, या उक्ती प्रमाणे झाडांची निगा ठेवत २०० झाडे डौलाने उभी
माथेरान/ चंद्रकांत सुतार :
माथेरान शहर कॉग्रेस पक्षाने सन २०१५ ला माथेरान वखारी नाका ते लेक व्ह्यू हॉटेल मेन रोड लगत 2 ते 3 फुटी करंज जातीच्या रोपांचे वृक्षारोपण केले होते, त्या नंतर त्या रोपांना वेळच्यावेळी निगा राखली जात होतीच, सरस्वती विद्या मंदिर ह्या शाळेतील अनेक विद्यार्थीनी घरून बिसलेरी बाटलीत पाणी नेऊन त्या झाडांना पाणी घातले आहे, व त्या झाडाची निगा राखली आहे, आज पाच वर्षे झाले रोपांचे वृक्ष होत, अनेक वेळा मोठाले वाढलेले झाड काहीनी तोडले तर अनेक वेळा कोवळ्या फांद्यांवर माकडांनी उडी मारल्याने तुटल्या गेल्या, अन्यथा ही रोपे आज झाड रुपात दिसली असती.
काँग्रेस पक्षाने लावलेल्या ह्या रोपांना शालेय विद्यार्थ्यांनचा मोठे सहकार्य मिळाले, त्या मुळे पुढे अजून ह्या झाडाचे नुकसान होऊ नये. म्हणून कॉग्रेस पक्षाने आज नवीन वृक्षारोपण न करता केलेल्या वृक्षारोपण संवर्धनासाठी आज सकाळ पासूनच सर्व कार्यकर्ते वृक्षप्रेमी वखारी नाका येथे जमुन त्या ठिकाणी असलेल्या झाडांची वृक्षसंवर्धनाच्या कामात सहभागी झाले, तेथील झाडांना काट्याचा आधार देण्यात आला. ज्या झाडाच्या फांद्या इतरत्र वाढल्या आहेत त्याचा छाटणी करण्यात आली. काही झाडांना जाळीचे सवरक्षण देण्यात आले, झाडांच्या मुळा जवळ माती टाकण्यात आली, आजूबाजूचे दगड माती व्यवस्थित करण्यात आली. असेच वृक्षसंवर्धनाचे काम प्रत्येक नागरिकांनी, संस्थेने, पक्षाने नियमित वेळच्या वेळी केले तरी वृक्षारोपण पेक्षा कितीतरी जास्त पटीने वृक्ष वाढतील हे सत्य नाकारता येत नाही, म्हणूनच आजचा कॉग्रेस पक्षाचा वृक्षसंवर्धनाचा निगा राखणे कार्यक्रम माथेरान साठी महत्वाचा आहे.
यावेळी माथेरान काँग्रेस शहर अध्यक्ष मनोज खेडकर, नगरसेवक शिवाजी शिंदे, संतोष लखन, सुनील शिंदे, आदित्य भिल्लारे, केतन रामाने,भास्कर शिंदे मंगेश शिंदे, राकेश कोकळे, नितीन शहा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते