20200722_070529
अलिबाग कोकण ठाणे ठाणे डहाणू ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे पेण महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी विदर्भ सामाजिक सुधागड- पाली

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित

● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित

पनवेल / संजय चौधरी :
कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा प्रादुर्भाव रायगड, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, आदिवासी समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ता. आदिवासी सम्राटचे संपादक, पञकार मिञ असोसिएशनचे (रजि.) सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र शासन उपक्रम),

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्याचे युवा सरचिटणीस, पनवेल प्रेस क्लबचे सदस्य, पनवेल तालुका पञकार संघर्ष समितीचे सदस्य, पेब किल्ला – विकटगड आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी कोरोना महामारीच्या संकटात गरिब- गरजू, अशिक्षित व शासकीय सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी पाड्यांवर जाऊन कोरोना महामारी संकटा विषयी माहिती देवुन त्यांचे प्रबोधनासह सामाजिक भान ठेवून आदिवासी गरीब व हातमजुरी काम करणा-या कुटुंबांना दानशूर व सेवाभावी सामाजिक संस्था, संघटनेच्या माध्यमातून जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करणेस मदत केली आहे.
तसेच त्यांच्या आदिवासी सेवा संघाच्यावतीने आदिवासी समाजातील अपंग, वृद्ध कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप केले. या कोरोना बिकट परिस्थितीत केलेल्या सामाजिक कार्याची दखल श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व ठाणे अरुणोदय वृत्तपत्राने दखल घेत पञकार गणपत वारगडा यांना “कोराना योद्धा ” सन्मान पञ देवून सन्मानित केले आहे.

—————————
माझ्या सारख्या गावपातळीवर काम करणा-या कार्यकर्त्यांला श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व ठाणे अरुणोदय वृत्तपत्रांनी दखल घेऊन मला कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केल्याने समाजामध्ये अधिक काम करण्यास ऊर्जा मिळाली आहे.
– गणपत वारगडा, पञकार
अध्यक्ष, आदिवासी सेवा संघ (रजि. )
———————–

2 thoughts on “आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

93 − 87 =