20200914 090459
कर्जत ठाणे ताज्या बदलापूर सामाजिक

वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत

वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत

कडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन

बदलापूर/ प्रतिनिधी :
कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी यांचे निधन झाले. सुदैवाने या आम्पत्यांना असणारे दोन मुले हे दुस-या खोळीत झोपल्याने ते बचावले. माञ, घरातील आई- बाबाच गमावल्यानंतर या दोन्ही चिमुकल्यांचा मायेवरचा छायेपासून लांब रहायले. त्यामुळे या दोन्ही मुलांचा पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य स्तरीय कबड्डी पट्टू असलेल्या कै. मोरेश्र्वर कडाळी यांच्या बाबतीत दुर्घटना घडल्याने आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या पदाधिका-यांनी तात्काळ भेट घेतली. कै. मोरेश्र्वर कडाळी व कै. बुधी कडाळी त्यांच्या दोन चिमुकल्यांना मायेचा आधार म्हणून आदिवासी क्रिडा असोसिएशने ३९,५०० रूपयांची आर्थिक मदत केली. त्यातील ३०,००० हे नॅशनल बँकेत FD करण्यासाठी तर ऊर्वरित ९,५०० रूपये हे जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चासाठी देण्यात आल्याचे आदिवासी क्रिडा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन वारगडे यांनी सांगितले आहे.
तसेच कडाळी कुटुंबात मृत्यू पावलेल्या ठिकाणी अंबरनाथचे तहसीलदार श्री. देशमुख घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. माञ, कै. मोरेश्र्वर व त्यांच्या पत्नी कै. बुधी कडाळी यांना शासकीय आर्थिक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा व पञव्यवाहार करणार असल्याचे आदिवासी क्रिडा असोसिएशनचे संस्थापक, पञकार गणपत वारगडा यांनी सांगितले आहे.
यावेळी ठाणे जिल्हा आदिवासी संघटना अध्यक्ष संतोष भगत, समाजसेवक रामदास शिंगवे, हनुमान पोकळा, नारायण पारधी तसेच आदिवासी क्रिडा असोसिएशनचे पदाधिकारी भगवान भगत, जयराम उघडा, भालचंद्र सांबरी, बाळा मुकणे, दत्तात्रेय हिंदोळे, श्री. ढोले, महेश निरगुडा, बाळा मुकणे, विजय गिरा,भगवान कडाळी, आदि. सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + = 18