IMG-20201005-WA0015
कर्जत ताज्या सामाजिक

माथेरान डोंगरपट्टीतील आदिवासी वाड्या समस्याच्या विळख्यात!… मूलभूत सोयी- सुविधापासून वंचित

माथेरान डोंगरपट्टीतील आदिवासी वाड्या समस्याच्या विळख्यात!

मूलभूत सोयी- सुविधापासून वंचित

कर्जत/ मोतीराम पादिर :
कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरपट्टीती बहुसंख्यने आदिवासी समाज राहतोय. माञ, मूलभूत सोयीसुविधा पासून अद्यापही वंचित आहे. या गावातून त्या गावात जायाचं म्हटलं तरी रस्ता अभावी जाता येत नाही. एवढं काय तर एखाद्या आजारी व्यक्ती पडल्यानंतर ढोळीच्या साहाय्याने खाली उतरून दवाखान्यात घेऊन जावे लागते. याकरिता आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर पादीर यांनी माथेरान डोंगर पट्टयातील असणा-या वाड्यांची बैठक आषणेवाडी येथे (दि. ४ ऑक्टो.) रोजी घेण्यात आली. डोंगरपट्टीतील किरवली ते बेकरेवाडी आदिवासी वाडीला जाणारा रस्ता, आदिवासीचे गावठाण, मसणवठा, खावटीचे प्रस्ताव, मनरेगा अंतर्गत कामे या सारखे अनेक विषयांवर चर्चा झाली.
तसेच वरील कामे करण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही राजकीय पुढा-यांनी या विषयी माहिती दिलीच नाही. अशी परिस्थिती असतांना देखील राजकीय पुढा-यांनी किंवा स्वंयम घोषीत आदिवासी नेत्यांनी याकडे कधी लक्ष दिले नाही. माञ, राजकारण आल्यानंतर हेच स्वंयम घोषीत आदिवासी नेते पुढा-यांबरोबर हातमिळवणी करून स्वतःचे खिसे भरून गप्प बसले जातात. मग स्वंयम घोषीत आदिवासी नेते समाजाचे कैवारी कसे होतील? असा प्रश्न सर्वसामान्य आदिवासींना पडला होता.
यावेळी बैठकीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण आढावा समितीचे अध्यक्ष श्री. सावळा, मंडळाचे अध्यक्ष चाहू सराई, जे.के. पिरकर, सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सांबरी, संतोष सांबरी, आदिवासी क्रिडा असोसिएशनचे अध्यक्ष मोहन वारगुडे, उपाध्यक्ष भगवान भगत, कार्याध्यक्ष रमेश बांगारी, कैलास खडके, गणेश पारधी, जगन पारधी आदी. ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 19 = 25