20201010 214622
ताज्या सामाजिक सुधागड- पाली

पिडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन न झाल्यास आंदोलनाचा इशारा..!

पिडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कडक शासन न झाल्यास आंदोलनाचा इशारा..!

सुधागड तालुका आदिवासी कातकरी समाज संघटना आक्रमक

सुधागड- पाली/ प्रतिनिधी :
सुधागड-पाली एका 16 वर्षीय मजुरी करणाऱ्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर ठेकेदाराने बलात्कार केल्याची व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली होती. या गंभीर प्रकारानंतर संपूर्ण आदिवासी कातकरी समाज आक्रमक झाला आहे. अदिवासी कातकरी समाज पाली सुधागड यांच्या वतीने या घटनेचा निषेध करत संबंधित ठेकेदाराला कडक शासन व्हावे या मागणीचे निवेदन पाली पोलीसांना शनिवारी (ता.10) देण्यात आले.
हे निवेदन पोलीस उपनिरिक्षक अजित साबळे यांनी स्वीकारले. निवेदन देते वेळी अदिवासी कातकरी समाज सुधागड-पाली अध्यक्ष चद्रकांत वाघमारे, आदिवासी परिषद संघटनेचे कोकण संघटक रमेश पवार, विश्वास भोय, कृष्णा वाघमारे, दगडु वाघमारे, वामन वारे, चंद्रकांत वाघमारे यांच्यासह पदाअधिकारी, समाजबांधव उपस्थीत होत.