IMG-20201011-WA0012
ताज्या पनवेल

श्रीमती लीलावती मोतीलालजी बांठीया यांचे स्मरणार्थ गोदान तसेच वेद विद्या गुरुकुल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मसाला दूध व अल्पोपहार वाटप

श्रीमती लीलावती मोतीलालजी बांठीया यांचे स्मरणार्थ गोदान तसेच वेद विद्या गुरुकुल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मसाला दूध व अल्पोपहार वाटप

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल मधील सुप्रसिद्ध व्यापारी स्व. महेंद्रकुमार मोतीलालजी बांठिया यांच्या मातोश्री श्रीमती लीलावती मोतीलालजी बांठीया यांचे वयाच्या ८३व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे.
त्यांच्या स्मरणार्थ पनवेल येथील पांजरपोळ येथे एक गाय गोदान करण्यात आली. यावेळी सोबत अनुज, तनुज, आकाश महेंद्रकुमार बांठीया उपस्थित होते. त्याचप्रमाणे पळस्पे येथे असलेल्या वॉरियर फाउंडेशनच्या वेद विद्या गुरुकुल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मसाला दूध व अल्पोपहार देण्यात आला. त्यावेळी सोबत राजेंद्र बोहरा, संजीत मुथा, श्रीमती अमीता महेंद्रकुमार बांठीया, सौ.हर्षाली अनुज बांठीया, मल्लू सौदे, श्रेणिक कटारिया, महेंद्र पुरोहित, राजू परमार, राजू कोठारी व मित्र परिवार उपस्थित होते.

One thought on “श्रीमती लीलावती मोतीलालजी बांठीया यांचे स्मरणार्थ गोदान तसेच वेद विद्या गुरुकुल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मसाला दूध व अल्पोपहार वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

53 − 47 =