20201101_212407
ठाणे ताज्या पालघर मुंबई सामाजिक

आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे

आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे

मोखाड्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पालघर/ प्रतिनिधी :
अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना रूग्णसेवा मिळावी व आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी तसेच येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे म्हणून आरोहण संस्थेने, सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उतातरदायित्व निधीतून रुग्णवाहिका व आधुनिक शेतीची औजारे ऊपलब्ध केली आहेत. त्याचे लोकार्पण विधानसभेचे ऊपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मोखाड्यात करण्यात आले आहे.
आरोहण संस्थेने अतिदुर्गम जव्हार आणि मोखाडा तालुक्यात गेली 14 वर्षापासून कुपोषण, पाणी समस्या, शेततळे, बंधारे, कृषी क्षेत्रात, पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षणावर भरीव काम केले आहे. त्यासाठी सिमेन्स कंपनी लिमिटेड यांनी संस्थेस सामाजिक उतातरदायित्व निधीतून सहकार्य करून संयुक्तपणे उपक्रम राबविले आहेत. या भागातील अत्यंत संवेदनशील गरज ओळखून संस्थेने सुमारे 18 लाख रूपये किंमतीची सुसज्ज रुग्णवाहिका तसेच भात लावणी, कापणी आणि मळणी चे आधुनिक औजारे बचत गटांना सामाजिक उतातरदायित्व निधीतून ऊपलब्ध करून दिली आहेत. तसेच आदर्श ग्रामपंचायत कशी होईल आणि ग्रामपंचायती चा कारभार कसा करावा या मार्गदर्शिका पुस्तीकेचे प्रकाशन विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी नरहरी झिरवाळ यांनी आरोहण संस्थेने अतिशय बारकाईने अभ्यास करून मोखाडा सारख्या दुर्गम भागात आदिवासी विभागाच्या संस्थांच्या तुलनेने कौतुकास्पद काम केल्याचे सांगितले आहे. आमदार सुनिल भुसारा यांचा वाढदिवसाच्या दिवशीच हा कार्यक्रम होत असल्याने हा कार्यक्रम आनंद द्विगुणीत करणारा असल्याचे ही झिरवाळ यांनी सांगितले आहे. तर आमदार सुनिल भुसारा यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या प्रत्येक लोकहिताच्या कामास आपण कायम सहकार्य करण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले आहे.
याप्रसंगी आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, आरोहण संस्थेच्या कार्यकारी संचालक डॉ. शुभलक्ष्मी अय्यर, जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, मोखाडा पंचायत समिती च्या सभापती सारिका निकम, डहाणू पंचायत समिती च्या सभापती स्नेहलता सातवी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, हबीब शेख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, शिवसेना मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर, पंचायत समिती सदस्य प्रदिप वाघ, तहसीलदार अश्विनी मांजे, गटविकास अधिकारी संगीता भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

36 − = 35