Img 20201106 Wa0044
महाराष्ट्र मुंबई सामाजिक

दिवाळी उत्सव साजरा करण्यसाठी शासनाने काढले मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक

दिवाळी उत्सव साजरा करण्यसाठी शासनाने काढले मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक

मुंबई/ प्रतिनिधी :
कोविड १९ covid- 19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने खालील प्रमाणे. मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये आधापही कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळून येत आहेत. चालू वर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाचा झालेल्या प्रादूर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण उत्सव अत्यंत साध्य पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत या वर्षीचा दिपावली उत्सवपूर्ण खबरदारी घेऊन अंत्यत साध्या पद्धतीने साजरा करावा संसर्गमूळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाही त्यामूळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरूपात मर्यादित राहिल याची दक्षता घेण्यात यावी उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे तसेच नागरिकांनी गर्दी व मोठ्या प्रमाणात एकत्रीत येऊ नये.
माक्सचा वापर आणि सोशल डिस्टंसिग चे पालन करावे जेणेकरून संसर्ग पण वाढणार नाही दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आंतषबाजी करण्यात येते त्यामूळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्रणिमात्राच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सव नंतर बराच कालावधी पर्यत दिसून येतात पूर्ण आजारामूळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामूळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. हे विचारात घेऊन नागरिकांनीच चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे त्यांचा त्रास होऊ शकतो त्या ऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून दिवाळी उत्सव साजरा करावा या उत्सवा दरम्यान कोणत्याही प्रकारच्या सार्जजनिक उपक्रम कार्यक्रम उदाहणार्थ दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नये. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाइन. केबल नेटवर्क, फेसबुक माध्यमाद्वारे त्याचे प्रसारण करावे. सास्कृतीक कार्यक्रम आयोजितआरोग्यबिषयक उपक्रम शिबिरे उदाहरणार्थ रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना.
मलेरिया, डेग्यू इत्यादी. आजार आणि याचे प्रतिबंधक उपाय तसेच स्वच्छाता याबाबत जनजागृती करण्यात यावी मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रीत येऊ नये याची दक्षता घेण्यात यावी कोरोना१९ या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधित महापालिका पोलिस स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच या परिपत्रकानुसार व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काहि सुचना नव्याने प्रसिद्धझाल्या याचे देखील अनुपालन करावे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www maharashtra.gov.in या संकेतस्थावर उपलब्ध करण्यात आले आह. राज्यपाल यांच्या आदेशान्वये उपसचिव महाराष्ट्र शासन संजय केळकर यांच्या स्वाक्षरीने सदर आदेश पारीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 7