IMG-20201107-WA0017
कर्जत ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई

पनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई

मास्क परिधान करणे अनिवार्य- पनवेल महापालिका

पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी महापालिकेची मोहीम

पनवेल/ साहिल रेळेकर :
मागील काही दिवसांपासून पनवेलमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच मृत्यू दर देखील कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील समाधानकारक आहे. परंतु असे असले तरीही कोरोना महामारीचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी सोशल डिस्टनसिंग सह मास्क वापरणे देखील आवश्यक असल्याने पनवेल महापालिकेच्या माध्यमातून मास्क परिधान न केलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. विशेषतः मॉल, कपड्यांचे शोरूम्स,जनरल स्टोअर्स, ज्वेलर्स शोरूम्स, सुपर मार्केट, बाजारपेठा आदी ठिकाणी दिवाळीचा सण जवळ आल्याने खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. परंतु यादरम्यान कोरोनाची लागण होऊ नये यासाठी स्वतःसोबत इतरांचीही काळजी घेण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांवर पनवेल महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई केली जात आहे.
शासनाने दिलेले निर्देश तसेच पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच सोशल डिस्टनसिंग चे देखील पालन व्हावे यासाठी अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पनवेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात आटोक्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे त्यामुळे लवकरच पनवेलमधून कोरोना पूर्णपणे हद्दपार व्हावा यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया पनवेल महापालिकेचे प्रभाग क्रमांक ड चे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी व्यक्त केली आहे.
पनवेल महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सर्वांच्या हितासाठी आपले कर्तव्य बजावत असताना विना मास्क असणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर कारवाई करत आहेत. परंतु अनेक महाशय उर्मठपणे “आम्ही दंड भरणार नाही” अशी बेताल भाषा वापरून हुज्जत घालत असल्याचे देखील दिसून येत आहे त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांनी आपल्या बेशिस्तपणाला वेळीच लगाम घातली नाही तर पनवेलमध्ये आटोक्यात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा आधीप्रमाणे बळावेल असे मत पनवेलच्या सुजाण नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

One thought on “पनवेलमध्ये विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

38 + = 43