IMG-20201124-WA0003
ताज्या पनवेल सामाजिक

पनवेल प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीला दिल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा

पनवेल प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीला दिल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा

शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनीही केले संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

विविध क्षेत्रातून होतोय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल/ प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील पत्रकारांची शिस्तबध्द संघटना म्हणून नेहमीच राजकीय वर्तुळात उल्लेख केला जातो अशा पनवेल प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणीची नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली. त्यातच सलग चौथ्या वेळेला या संघटनेचे अध्यक्ष पद कायम ठेवून संघटना कशी एकनिष्ठ असावी याचे उत्तम उदाहरण विविध संघटनांना देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील महिला पत्रकारांना प्रथमच पनवेलमध्ये जबाबदारी सोपवून इतिहास घडविण्याचे काम केले आहे. याची दखल लोकनेते मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी घेतली आणि पनवेल प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनीही या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना तुम्हाला येणाऱ्या अडचणींमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास निर्माण केला.
जन माणसांसाठी कार्य करीत असताना आपल्या पोटाची खळगी भरण्याची चिंता दूर सारून फक्त समाजकारण करण्याचा वसा पत्रकार म्हणून घेवून कार्य करणाऱ्या पत्रकारांचा योग्य सन्मान झालाच पाहिजे, तसेच पत्रकारिता करीत असताना किती अडचणींचा सामना करावा लागतोय, निःपक्ष पत्रकारिता आणि बेडर लिखाण, ज्यामुळे अन्यायाविरोधात खऱ्या अर्थाने आपण लढू शकतो हे काम पनवेलमधील प्रेस क्लबच्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून वेळोवेळी दाखविले आहे. त्यामुळे अशा लेखणीबहाद्दुर पत्रकारांना पुढील वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेवून जनतेची कामे करण्यासाठी पनवेलचे भाग्यविधाते, लोकनेते, मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्व.दि.बा.पाटील पनवेल – उरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी पनवेल प्रेस क्लबच्या सदस्यांना आपुलकीने संपर्क साधून शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार संघटनेचे कार्यालय गाठले. मात्र पत्रकारांनी त्यांचा मान त्यांना देत बबनदादा पाटील यांच्या शुभेच्छा स्विकारल्या. यावेळी शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, पत्रकार हे आमचे सर्वस्व आहेत, आज पत्रकार क्षेत्रातील मंडळी आमच्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. जणसेवेत जात असताना, त्यांच्या अडचणी जाणून घेत असताना आणि त्यांच्या आलेल्या कामांचा पाठपुरावा करीत असताना आम्ही काय काम करतोय हे पत्रकार त्या अन्यायग्रस्त माणसांपर्यंत आमचे हे काम पोहचावीत असतात. कोणत्याही अपेक्षा न बाळगता पत्रकार हे काम करीत असल्यामुळे मला तर त्यांच्याकडून ही ईश्वरसेवा सुरू असल्याचाच भास होत असल्याची भावना बबनदादा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच पनवेल प्रेस क्लबच्या पत्रकारांना येणाऱ्या अडचणींसाठी आम्ही अहोरात्र उभे राहू असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या महान नेत्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, चौकार किंग अध्यक्ष सय्यद अकबर, उपाध्यक्ष गणपत वारगडा, भरत कुमार कांबळे, पत्रकारांची लेखणी असलेले सरचिटणीस राज भंडारी, सह चिटणीस आप्पासाहेब मगर, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शब्दांची योग्य पद्धतीने मांडणी करून शब्दफेक करणारे प्रेस क्लबचे संघटक साहिल रेळेकर, महिला आघाडी प्रमुख सुमेधा लिम्हण, प्रसिद्धी प्रमुख सनीप कलोते, सदस्य क्षितिज कडू, असीम शेख, शंकर वायदंडे आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 78 = 82