फार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल
आदिवासी सेवा संघाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दौंडकर यांना दिले पञ
मालडूंगे, धोदाणी, वाघाचीवाडी, देहरंग, गाढेश्वर, तामसई, करंबेळी, मोरबे, वाजे- वाजेपूर परिसरात फार्महाऊसवाल्यांचा मोठा धिंगाणा
फार्महाऊस मालकाबरोबर तोडपाणी करू नका, गुन्हे दाखल करा तरच फार्महाऊसवाले आटोक्यात येतील; स्थानिक ग्रामस्थांची मागणी
पनवेल/ गणपत वारगडा :
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये नवी मुंबई, खारघर, पनवेल शहर, उरण, नेरूळ, वाशी, मुंबई सह इतर ठिकाणी रहाणा-यांनी निसर्गाच्या वातावरणात आपाल्या कुटुंबाला राहण्यासाठी फार्महाऊस बांधलेले आहेत.
आता, हेच काही फार्महाऊस काॅटेज, रिपोर्ट व लाॅजिंग टाईपचे झाल्याचे दिसून येतात. कधी- कधी ब- डे पार्टी, गेट टुगेदर सारख्या पार्ट्यां साऊंड स्पिकर मोठ्या आवाजात धांग- धिंगाणात पहायला मिळतात. त्यामुळे मालडूंगे, धोदाणी, वाघाचीवाडी, देहरंग, गाढेश्वर, तामसई, करंबेळी, मोरबे, वाजे- वाजेपूर येथील स्थानिकांना खुप मोठा ञास सहन करावा लागत असतो. विशेष म्हणजे यांना शासनाची कोणती ही परवानगी नसतांनाही देखील फार्महाऊसचे मालक बिनधास्तपणे अनाधिकृतरित्या व्यवसाय करतांना दिसताहेत. हे आटोक्यात आणण्यासाठी व फार्महाऊस चे मालक व संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांनी पनवेल येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दौंडकर यांना पञ दिले आहे.
शिवाय, फार्महाऊसवर होणारा धांग- धिंगाणा, चुकीची कामे यासंदर्भात माहिती देत असतांना अनेकदा पोलीस अधिकारी हे गुन्हे दाखल न करता संबंधिताबरोबर तोडपाणी करून सोडून दिले जातात. व गुप्त माहिती देणा-यांचे नावं उघडकीस करतात. त्यामुळे गुप्त माहिती देणा-यांच्या जिवाला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता असते, असेही आदिवासी सेवा संघाने दिलेल्या पञात म्हटलं आहे.
wow the war within raid boost kreativwerkstatt-esens.de .