वन्य प्राण्यांसाठी बेकरेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधले पाट बंधारे
कर्जत/ नितीन पारधी :
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असल्याने या ठिकाणी वन्य प्राणी मोठया प्रमाणात आहेत. जंगल दाट असल्याने हे वन्य प्राणी पाण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. कर्जत तालूक्यातील असणारे बेकरेवाडी हे गाव माथेरानच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी मोठया प्रमाणात येत असतात. त्यामुळे या वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी दरवर्षी या बेकरेवाडीत ग्रामस्थ एकत्र येवून पाट बंधारे बांधत असतात. येणार्या काळात वन्य प्राण्यांना पाण्याची अवश्यकता बासत असते. त्याकरिता या वर्षी सुध्दा बेकरेवाडी गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून पाटबंधारा बांधण्यात आला.
यावेळी बेकरेवाडीतील 25 ते 30 ग्रामस्थ एकत्र येऊन पाट बंधा-याचे काम पूर्ण केले. त्यामुळे एकत्र श्रमदान केल्याने संपूर्ण गावाची एकजूठ दिसून आली.