20210302_211257
कर्जत कोकण ताज्या महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता..! आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन

७५ वर्ष वंचित असलेल्या माथेरानच्या डोंगरपट्टीतील आदिवासी बांधवांना अखेर मिळाला खडीकरण रस्ता!

आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन

कर्जत/ तुकाराम वारगुडे :
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपट्टी आदिवासी वाड्यांना जोडणारा खडीकरण रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
माथेरानच्या डोंगरपट्टीत बहुसंख्य आदिवासी लोक राहतात. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. तरी ही माथेरानच्या डोंगरपट्टीत रहाणा-या आदिवासी वाड्या – पाड्यांना अद्यापही रस्ता नसल्याने अनेक आदिवासींना येण्या- जाण्यासाठी प्रचंड ञास सहन करावा लागत होता. शिवाय, पिण्यासाठी पाण्याची सुध्दा तीच अवस्था असल्याने महिला वर्गांना तारेवरची कसरतच करावी लागत होती. माञ, आसल ग्रामपंचायतमध्ये तरूण व सुशिक्षित युवा वर्गांचा समावेश असल्याने या माथेरान डोंगरपट्टीचा विकास कामांचा कायापालट केला.
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्या वनिता मोहन वारगुडे, मंदा कुंडलिक कदम या दोन्ही सदस्या तसेच नारायण पिरकर, बाळू झुगरे, भगवान कोकरे, पुंडलिक कदम, अर्जुन झुगरे, चंदर पिरकर, सखाराम झुगरे या स्थानिक कार्यकर्त्यांनी माथेरान डोंगरपट्टीमध्ये आदिवासी भागातील रस्ता मंजूर करण्यास पुढाकार घेऊन हा खडीकरण रस्ता मंजूर देखील केला.
या माथेरान डोंगरपट्टीतील मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन शनिवार (दि. २७ फेब्रु.) रोजी आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यामुळे आजूबाजूच्या आदिवासी वाड्या- गावं एकञ जोडले जातील व दळणवळणाची सोय झालीअसल्याचे समाधान व्यक्त करत, अजुन काही आदिवासी गावातील समस्या असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी येथील आदिवासी बांधवांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 31 = 39