1615094868851
ताज्या नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्र सामाजिक

वाजे हायस्कुलच्या संजीवनी मढवीला बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर 

वाजे हायस्कुलच्या संजीवनी मढवीला बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर 

पनवेल / प्रतिनिधी :
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जळगाव येथील विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे अग्रगण्य संस्था, नोबेल फाउंडेशन आणि श्रमसाधना ट्रस्टचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय नोबल विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी अशा तीन गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील वाजे हायस्कूलची विद्यार्थिनी संजीवनी मढवी हिला उत्तेजनार्थ बाल वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे. 
रायगड जिल्ह्यातून निवड झालेली नोबेल बाल वैज्ञानिक पुरस्कार विजेती कुमारी संजीवनी बळीराम मढवी ही पनवेल तालुक्यातील जनसेवा सेवा संघाच्या वाजे हायस्कुल व ज्यू. कॉलेज वाजे येथे शिक्षण घेत आहे. या बाल वैज्ञानिक पुरस्काराबद्दल टी. डी. म्हात्रे, (सेक्रेटरी जनसेवा संघ), दिगंबर म्हाळगी, (माजी सेक्रेटरी जनसेवा संघ), राजेंद्र भालेकर, (सरपंच वाजे ग्रामपंचायत), रेवन पाटील (उपसरपंच), गणेश पाटील (सदस्य), बबन कोंडीराम पाटील (माजी सरपंच), नरेश पाटील- (पोलीस पाटील), बबन पाटील (माजी सरपंच), जयवंत भालेकर, गजानन पाटील, हेमेन्द्र चिकने, चंद्रकांत फडके, शिल्पा खुटले यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

51 + = 61