Img 20210317 Wa0016
ताज्या पनवेल सामाजिक

म.ए.सो.आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातर्फे करण्यात आला “सन्मान शक्तीचा” 

म.ए.सो.आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातर्फे करण्यात आला “सन्मान शक्तीचा” 

पनवेल/ प्रतिनिधी :
गेले वर्षभर आपण सर्वजण कोविड १९ या संकटाचा सामना करत आहोत , या संकटात अनेकांनी आपले आपले कर्तव्य चोख बजावले आहे, परंतु या सर्व संघर्षात स्त्री शक्तीचे योगदान नक्कीच अतुलनीय आहे. या कालावधीत निर्भयपणे अनेक महिलांनी आपले कर्तव्य बजावत स्वहितापलीकडे जाऊन सामाजिक जबाबदारी अत्यंत धैर्याने, पूर्ण केली आहे, आर्थिक  संकट आल्यावर कुटुंबासाठी छोटेखानी व्यवसाय सुरू करून इतर महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. अशा लघु उद्योजिका, डॉक्टर, परिचारिका , संस्कारवर्ग संचालिका, गीता प्रचारक , रिक्षा चालक, अनाथ आश्रमाच्या संचालिका, सरपंच  अशा एकूण १२ शक्तीदुर्गांचा शेला, कौतुक पत्र देऊन   माध्यमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. समिता सोमण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.         जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सन्मानित महिला सौ. करंदीकर, सौ. कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका  मा.सौ . समिता सोमण यांनी केले. “आपला सन्मान हा प्रातिनिधिक स्वरूपात सर्व महिला शक्तीचा आहे, आपले कार्य हे अतुलनीय आहे व हे कार्य आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे “असे गौरवोद्गार  त्यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात मांडले, या प्रसंगी प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ.निशा देवरे व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम. नमिता जोशी यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या सहा. शिक्षिका श्रीम. प्रीती धोपाटे यांनी केले. विद्यालयाच्या सहा. शिक्षिका सौ. बापट यांनी आभार मानले. या कार्यक्रमात लघु उद्योजिका सौ. पवार, संस्कार वर्ग संचालिका सौ. करंदीकर, डॉ. स्वाती माने, परिचारिका सौ. भालेराव, लघु उद्योजिका सौ. भागवत, परिचारिका सौ. चव्हाण, गीता प्रचारक सौ. कुलकर्णी, समाजसेविका सौ. रामधरणे, आश्रम संचालिका सौ. काटकर, सरपंच सौ. वासकर, रिक्षाचालिका सौ. शितोळे व लघु उद्योजिका श्रीमती शिंगण यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 41 = 45