1626836346056_download
ठाणे ताज्या नवी मुंबई पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड सामाजिक

समाजातील वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करण्याचा ‘रेमंड’चा संकल्प

समाजातील वंचित घटकांना दहा लाख कपडे दान करण्याचा ‘रेमंड’चा संकल्प

नवी मुंबई- पनवेल/ प्रतिनिधी :
 कापड आणि वस्त्रप्रावरणे यांचे उत्पादन व विक्री या व्यवसायात भारतात अग्रगण्य असलेल्या रेमंड या कंपनीने गूंज या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘लूक गुड, डू गुड’ (चांगले दिसा, चांगले करा) हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. 

हा एक प्रकारचा कपड्यांची देवघेवकरण्याचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ‘कामाची प्रतिष्ठा’ या विषयावर भर देण्यात येत आहे. भारतभरात ६०० हून अधिक शहरातील रेमंड स्टोअरमध्ये तसेच www.myraymond.com या वेबसाईटवर ऑनलाईन स्वरुपात हा उपक्रम राबविला जाईल. सध्या सुरू असलेल्या कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, ग्राहक आपले जुने कपडे उचलून देण्यासाठी अपॉईंटमेंटकरीता नोंदणी करू शकतात आणि ‘रेमंड होम असिस्ट’ या सुविधेद्वारे टेलरिंग सेवेची अपॉइंटमेंट मिळवू शकतात.या सेवेतून ग्राहकआपल्या घरात बसून शर्ट, पॅंट यांची शिलाई करवून घेऊ शकतात किंवा अपॉईंटमेंट घेऊन दुकानातही जाऊ शकतात.


आपल्या जुन्या कपड्यांचे दान करून कोणतीही व्यक्ती ‘रेमंड फॅब्रिक्स’साठी विनामूल्य शिलाई सेवा मिळवू शकेल किंवा गिफ्ट व्हाऊचर्स मिळवू शकेल. ही व्हाऊचर्स ऑनलाइन वटवली जाऊ शकतात किंवा या उपक्रमात सहभागी असलेल्या ‘रेमंड स्टोअर’मध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथे तयार कपडे घेण्यासाठी ती वापरली जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, वैयक्तिकृत कपडे घेऊ इच्छिणारे ग्राहक ‘रेमंड मेड टू मेजर स्टोअर’मध्ये व्हाऊचर वटवू शकतात.
या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देताना ‘रेमंड लिमिटेड’च्या ‘लाइफस्टाईल बिझिनेस’ विभागाचे मुख्य कार्यान्वयन अधिकारी गणेश कुमार म्हणाले, “कोविड साथीच्या काळात असे उपक्रम राबविणे अतिशय महत्त्वाचे व गरजेचे आहे, असे आम्ही ‘रेमंड’मध्ये मानतो. समाजातील वंचित घटकांना मदत करीत असताना आपणही चांगले दिसावे, याबाबत ग्राहकांना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमाद्वारे ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचणे, त्यांना कपड्यांच्या विनिमय कार्यक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांचे जुने कपडे दान करण्यात योगदान देण्याचे आमचे ध्येय आहे. गेल्या वर्षी आम्ही सुमारे दीड लाख कपड्यांचा विनिमय केला व ७३ टक्के इतका विमोचन दर गाठला. यंदाच्या वर्षीही या उपक्रमाला असेच यश मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.


“‘रेमंड’ने ‘गूंज’च्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक कपडे दान करण्याचा संकल्प सोडला आहे. गूंज ही स्वयंसेवी संस्था शहरांतील नागरिकांच्या निरुपयोगी वस्तूंचा उपयोग दारिद्र्य निर्मूलनासाठी करते आणि जगभरातील वंचित नागरिकांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी काम करते. ‘रेमंड’च्या ‘लूक गुड, डू गुड’ या सामाजिक उपक्रमामुळे कोविड व टाळेबंदीने ग्रासलेल्या शिलाई व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.‘लूक गुड डू गुड’हा उपक्रम १६ जुलै पासून सुरू झाला असून ३१ ऑगस्ट २०२१ रोजीपर्यंत तो भारतभरातील ‘रेमंड’च्या सर्व  स्टोअर्समध्ये आणि www.myraymond.com वर सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

+ 10 = 11