प्रसाद सावंत यांच्या संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ
स्वतःकडे नगरपालिका गटनेते पद, बांधकाम सभापती त्याचप्रमाणे सुविद्य पत्नीकडे गावाचे प्रथम नागरिक पद ( नगराध्यक्षा) असल्याने पक्षाचे संपर्क प्रमुख पद आहे. जर आपल्या स्वतःकडे एवढी महत्वाची पदे असताना त्यातच संपर्क प्रमुख पद हे सलग चार वर्षे उपभोगलेले असल्याने ज्यांनी खरोखरच या पक्षाला जिवंत ठेवले आहे अथवा सत्ता स्थापन करण्यात ज्यांनी ज्यांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे अशांना पदे मिळाली तर पक्षातील जेष्ठ सुध्दा मोठया उमेदीने पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील. या सद्भावणेने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा स्वखुशीने संबंधित नेतेमंडळी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रमुखांकडे सुपूर्द केला आहे. आपण स्वीकृत पदे अन्य मंडळींना देऊ शकत नाहीत आपल्या पदाला न्याय मिळवून देऊ शकत नसेल तर या पदांवर राहण्याची आपली नैतिक जबाबदारी नाही. या जागेवर अनुभवी तसेच जेष्ठ कार्यकर्ते यांना सामावून घेणे गरजेचे आहे. प्रसाद सावंत यांचे म्हणणे आहे.
————————-,,,,,,,,,,,————————
माथेरान/ मुकुंद रांजाणे :
शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करण्यात आणि इथल्या राजकीय घडामोडीत एक अग्रगण्य स्थान निर्माण केलेले ज्यांनी २०१६ च्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत भल्याभल्या दिग्गजांना अक्षरशः धूळ चारली होती. असे शिवसेनेचे केंद्रबिंदू समजले जाणारे संपर्क प्रमुख, नगरपरिषदेचे गटनेते तथा विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत यांनी अचानक १५ ऑगस्ट रोजी आपल्या संपर्क प्रमुख पदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे इथल्या एकंदरीतच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रसाद सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर दि.१६ डिसेंबर २०१४ मध्ये आपल्या काही निवडक सहकार्याना सोबत घेऊन ग्रामदैवत श्री पिसारनाथ महाराज मंदिरात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर जून २०१५ मध्ये संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपल्या पदाला साजेसा न्याय देण्यासाठी अनेक सकारात्मक, विधायक कामे स्वखर्चाने करून पक्षाला बळकटी दिली होती. त्यामुळे युवा वर्ग त्यांच्या कार्यप्रणाली वर खुश होऊन शिवसेनेकडे आकर्षित झाला होता. यामध्ये मुस्लिम समाजातील तरुणांनी सुद्धा स्वेच्छेने पक्षप्रवेश केला होता. प्रत्येक प्रभागातील तरुण हे केवळ प्रसाद सावंत यांच्यामुळेच इकडे वळले होते. आबालवृद्ध मंडळींनी सुध्दा या नवोदित उमद्या नेतृत्वाखाली कामे करण्याची तयारी दर्शवुन त्यांना पाठींबा दिला होता तर काही मोजक्याच परंतु राजकीय क्षेत्रात स्वतःची एक वेगळीच पकड असणाऱ्या मंडळींनी सुध्दा बिनशर्त पाठींबा दिला होता. याचाच फायदा शिवसेनेला २०१६ ला झाला आणि प्रसाद सावंत यांच्यामुळे नगरपालिका सभागृहात शिवसेनेचे एकूणच चौदा सदस्य निवडून गेले आहेत. तर दोन स्वीकृत सदस्य देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सर्व विरोधकांना फक्त प्रसाद सावंत यांच्या पुढील राजकीय खेळीची भि वाटत असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक काळात ज्यांनी स्वेच्छेने पक्षाला बिनशर्त पाठींबा दिला होता त्यांना निदान एक ते दोन वर्षांसाठी स्वीकृत सदस्य पदावर नियुक्त करणे हे पक्ष श्रेष्ठींचे कर्तव्य होते. त्यानुसार अडीच वर्षांचा कालावधी पार झालेला असताना स्वीकृत पदांसाठी,आणि उपाध्यक्ष पदासाठी काही इच्छुक मंडळी सातत्याने प्रसाद सावंत यांच्याकडे या पदाबाबत विचारणा करीत आहेत. परंतु नगरपालिका उपाध्यक्ष आणि स्वीकृत पदे अद्यापही रिक्त केली जात नाहीत.उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ सुद्धा अडीच वर्षात संपलेला आहे. त्यामुळे स्वतःहून त्यांनी बाहेर पडून नव्यांना संधी देणे आवश्यक आहे. परंतु ही मंडळी काही केल्या पदावरून पाय उतार होण्याची तयारी दर्शवित नसल्याने सावंत यांनी पक्षाच्या संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला असावा अशीच चर्चा सुरू आहे.
—————;;;;;——————;;;—————–
केवळ पदावर असल्यावर कामे करता येतात असे नाही तर आपण एक कार्यकर्ता म्हणून पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी आपल्या परीने सर्वस्वी प्रयत्न केल्यास सर्व काही व्यवस्थित होते. एकाच व्यक्तीकडे हे पद चार वर्षे ठेऊन इतरांची संधी डावलणे हे मनाला पटत नाही. त्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करीत आहोत जेणेकरून ज्यांना या पक्षासाठी खरोखरच तळमळीने कामे करावयाची आहेत त्यांना नक्कीच संधी मिळणार आहे.
प्रसाद सावंत – गटनेते माथेरान नगरपरिषद
————————————————————–
नुकताच संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा प्रसाद सावंत यांनी दिला आहे. त्यांच्या जागी तेवढयाच ताकदीने कामे करणारा वेळप्रसंगी तन,मन,धन अर्पूण पक्षाची धुरा समर्थपणे पेलणारा कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्यामुळे समस्त शिवसैनिक आणि ग्रामस्थांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.
योगेश जाधव – जेष्ठ शिवसैनिक माथेरान
———————————————————-
प्रसाद सावंत यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आता सर्वच कार्यकारिणी मध्ये नव्याने बदल घडवून जेष्ठ तसेच क्रियाशील कार्यकर्त्यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी सर्वांना विचारात घेऊन विशेष बैठकीचे आयोजन करून निर्णय घ्यावा. कुणाही एकाची मक्तेदारी पक्षात असू नये. सर्वांना पदे विभागून द्यावीत.तेव्हाच पक्षाला आगामी काळात सुद्धा उभारी मिळू शकेल.
प्रकाश सुतार – शिवसेना संस्थापक सदस्य तथा माजी नगरसेवक माथेरान
———————————————————