Img 20211002 Wa0018
कर्जत ताज्या रायगड सामाजिक

माझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे

माझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे

कर्जत येथे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा

कर्जत/ नितीन पारधी :
रायगड जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी संकटे आली त्या त्यावेळी जिल्ह्यातील शिक्षक वर्ग मदतीला धावला आणि त्यामुळे आलेल्या संकटांना परतवून लावता आले अशी भावना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केल्या. तर आपल्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केल्याने यशस्वी होत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी कबुल केले. दरम्यान, प्रतीक जुईकर यांच्या सारखे मराठी माध्यमातून शिकलेले आयएएस अधिकारी होतात ही अभिमानाची बाब असून जिल्ह्यात आणखी आयएएस अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी रायगड जिल्ह्यात शासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात केली.


कर्जत तालुक्यातील किरवली येथील शेळके बंधू मंगल कार्यालयात रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक आणि शिक्षतेतर कर्मचारी अशा 2020 आणि 2021 मधील 90 जणांचा सन्मान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार अदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद योगिता पारधी,जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती सुधाकर घारे यांच्यासह शिक्षक आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार सुरेश लाड, बांधकाम समिती सभापती नीलिमा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, कृषी समिती सभापती बबन मनवे, गीता जाधव, जिल्हा परिषदेमधील प्रतोद आस्वाद पाटील, बबन चाचले, माजी सभापती नरेश पाटील, नारायण डामसे, उमा मुंढे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी रणधीर सोमवंशी, कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुषमा ठाकरे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार अदिती तटकरे यांनी बोलताना आपल्या आईवडिलानंतर दुसरे स्थान असते ते शिक्षक, त्या गुरुजन वर्गाचे ऋण व्यक्त करताना आणि आभार मानण्याची गरज आहे. शिक्षकांनी आणि गुरुजन वर्गाने प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होत आहेत, पण हा सन्मान जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा आहे.गावागावात ज्या ज्यावेळी काही समस्या शिक्षकांचा विषय येतो त्यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित असतात. अशाप्रकारे नाळ शिक्षक आणि ग्रामस्थ यांची जुळलेली असते.शिक्षण क्षेत्रात पालकांची अपेक्षा ही शाळेकडून आणि आपल्या सारख्या आदर्श शिक्षक यांच्याकडून असते आणि हे जन्मापासून घरोघरी चित्र असते. प्राथमिक शाळेत शिकलेला विद्यार्थी आयएएस झालेला दिसतो हे सर्व आपल्या सारख्या गुरुजन वर्गामुळे शक्य झाले आहे. प्रतीक जुईकर यांच्या मुळे आपल्या सारख्या प्राथमिक शिक्षकांवर अधिक जबाबदारी येऊन पडली आहे याची सर्वांना जाणीव कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी आपले यश आणि आपली इच्छा आम्ही रायगड जिल्ह्यात पूर्ण करीत आहोत असे पालकमंत्री यांनी स्पष्ठ केले. रायगड जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरच सुरू करीत आहोत असे पालकमंत्री यांनी यावेळी जाहीर केले. शिक्षकांचे कौतुक करताना कोविडचे पहिले लॉक डाऊन झाले त्यावेळी सुरक्षा यंत्रणेला जबाबदार यंत्रणेची गरज होती आणि त्यावेळी शिक्षक वर्गाने चेक पोस्ट वर उभे राहून काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 1 = 1