20211113_035953
उरण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र सामाजिक

रस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन

रस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन

पनवेल / प्रतिनिधी :
पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता गेली १५ वर्षे रखडलेला आहे. मुंबईपासुन हाकेच्या अंतरावर असुनही या रस्त्याची दुरावस्था स्थानिक पुढा-यांना दिसत नाही? ना प्रशासनाला.
माञ, वाकडी ते दुंदरे रस्ता होणे हा मनसेचा प्रामाणिक हेतू असल्याने मनसेच्या माध्यमातून अनेक पञ व्यवहार प्रशासनाकडे केली आहेत. शिवाय, आंदोलनचा देखील इशारा दिल्याने मनसेच्या पाठपुराव्याने ६ कि.मी. रस्त्याचा एक छोटा पॅच तयार केला गेला होतो. परंतु, त्यानंतर पुन्हा सर्व प्रशासकीय कामकाज ठप्प झाले. आज पुन्हा अधिका-यांना आणि आमदारांना या रस्त्याच स्मरण करून देण्यासाठी “धोपाटणे आंदोलन” मनसे तर्फे करण्यात आले. लोकशाही मार्गाने आंदोलन शांततेत पार पडले याच्या पुढच आंदोलन आमच्या मार्गाने असेल असे मनसे कार्यकर्ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष योगेश जी चिल्ले, रायगड जिल्हा अध्यक्षअतुल भगत, रायगड जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, पनवेल तालुका उपाध्यक्ष दिनेश काशिनाथ मांडवकर, नेरे विभाग अध्यक्ष विश्वास पुंडलिक पाटील, आगरी कोळी कराडी सामजिक स्वंस्था महाराष्ट्र उपाध्यक्ष, दुदंरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भारत सुभाषशेठ भोपी, शेतकरी कामगार पक्षाचे दुदंरे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ उसाटकर व इतर सेल चे सर्व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 4 =